Mahabharat Story : परशूरामाने कर्णाला का दिला होता शाप? या तीन शापांमुळे झाला होता कर्णाचा मृत्यू!

कर्ण धनुर्विद्या शिकण्यासाठी गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे गेला तेव्हा कर्ण सुत पुत्र असल्याने त्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिला. यामुळे निराश होऊन कर्ण भगवान परशुरामांकडे गेला.

Mahabharat Story : परशूरामाने कर्णाला का दिला होता शाप? या तीन शापांमुळे झाला होता कर्णाचा मृत्यू!
महाभारत Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 9:30 PM

मुंबई : महावीर कर्णाशिवाय महाभारत (Mahabharat Story Marathi) युद्धाची कल्पनाही करता येत नाही. तसेच, हे नाकारता येत नाही की कौरव सेनापती कर्ण हा त्याचा प्रतिस्पर्धी अर्जुनापेक्षा चांगला धनुर्धर होता, ज्याची स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्तुती केली होती. कर्ण हा एक पराक्रमी योद्धा तर होताच पण तो महान दाता देखील होता. ज्यांनी युद्धाच्या परिणामाचा विचार न करता आपले चिलखत आणि कवचकुंडलं दान केले. कर्ण हा जन्माने क्षत्रिय होता पण तो सारथीच्या घरात वाढला त्यामुळे त्याला सुतपुत्र हे नाव देखील पडले. त्याचे शौर्य पाहून दुर्योधनाने त्याला अंगदेशचे सिंहासन दिले आणि जरासंधाच्या पराभवानंतर त्याला चंपा नगरीचा राजाही केले. पण या महान योद्ध्याचे जीवन तपश्चर्यापेक्षा कमी नव्हते.

अशा अनेक कर्माचे फळही त्याला भोगावे लागले ज्यात त्याचा कोणताही दोष नव्हता. नकळत घडलेले कर्म आणि इतरांच्या कल्याणामुळे त्यांना असे 3 शाप मिळाले, जे त्यांच्यासाठी घातक ठरले, या 3 शापांमुळे त्याला महाभारताच्या निर्णायक युद्धात अर्जुनाच्या हातून वीरगती मिळाली.

परशुरामांनी दिला पहिला शाप

कर्ण धनुर्विद्या शिकण्यासाठी गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे गेला तेव्हा कर्ण सुत पुत्र असल्याने त्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिला. यामुळे निराश होऊन कर्ण भगवान परशुरामांकडे गेला. कर्णाची प्रतिभा जाणून परशुरामाने त्याला आपला शिष्य बनवले. एके दिवशी परशुराम सराव करताना थकले होते, तेव्हा त्यांनी कर्णाला सांगितले की मला थोडी विश्रांती घ्यायची आहे. मग कर्ण खाली बसला आणि परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून विसावले. काही वेळाने तेथे एक विंचू आला, त्याने कर्णाच्या मांडीला चावा घेतला.

हे सुद्धा वाचा

आता कर्णाला वाटले की जर त्याने विंचू हलवून काढण्याचा प्रयत्न केला तर गुरुदेवांची झोप भंग होईल. त्यामुळे त्याने विंचू काढण्याऐवजी त्याला डंखू दिला, त्यामुळे त्याला रक्तस्त्राव झाला. त्यामुळे कर्णाला भयंकर त्रास होऊ लागला आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या. रक्त हळूहळू गुरु परशुरामांच्या शरीरात पोहोचल्यावर ते जागे झाले. कर्णाच्या मांडीला रक्तस्त्राव होत असल्याचे परशुरामांनी पाहिले.

हे पाहून परशुरामांना राग आला की एवढी सहनशीलता फक्त क्षत्रियातच असू शकते. तू माझ्याशी खोटं बोलून ज्ञान मिळवलं आहेस, म्हणून मी तुला शाप देतो की तुला जेव्हा जेव्हा माझ्याकडून दिलेल्या ज्ञानाची सर्वात जास्त गरज तेव्हा, तेव्हा ते काम करणार नाही. वास्तविक परशुराम क्षत्रियांना ज्ञान देत नसत. कर्णाला सुतपुत्र म्हणून ओळखून त्यांनी त्याला ज्ञान दिले होते.

यामुळे परशुरामाने कर्णाला शाप दिला

शाप मिळाल्यावर कर्ण अतिशय दुःखी झाला आणि परशुरामांच्या पाया पडून क्षमा मागू लागला. त्यांनी गुरू परशुरामांना सांगितले की त्यांना त्यांच्या खऱ्या आई-वडिलांची माहितीही नाही, गंगेत वाहत असताना त्यांना त्यांचे आई-वडील सापडले होते. मी इथे शिकण्याच्या उद्देशाने आलो आहे, मला कोणीही ज्ञान द्यायला तयार नव्हते मात्र तुम्ही मला ते प्रदान केले. कर्णाच्या बोलण्याने परशुरामाचा राग शांत झाला आणि ते म्हणाले की शाप परत घेणे शक्य नाही पण ज्या प्रसिद्धीसाठी तू धावत आहेस ती तुला नक्कीच मिळेल आणि तू महान धनुर्धारी होशील. यानंतर भगवान परशुरामाने कर्णाला आपले विजय धनुष्य अर्पण केले.

दुसरा शाप ब्राह्मणाने दिला होता

ब्राह्मणाने कर्णाला आणखी एक शाप दिला. एके दिवशी कर्ण बाण मारण्याचा सराव करत होता. मग त्याला झाडाझुडपातून एका प्राण्याचा चालण्याचा आवाज आला, त्याला वाटले की तिथे कोणीतरी हिंसक प्राणी असू शकतो, जो येथे राहणाऱ्या मानवांसाठी धोकादायक ठरू शकतो, म्हणून त्याने त्या दिशेने बाण सोडला.

बाण कोणत्याही हिंसक प्राण्याला लागला नाही तो एका गाईला लागला, त्यामुळे तीचा मृत्यू झाला. त्या गाईचा मालक ब्राह्मण होता, तो हे सर्व पाहून दुःखी झाला आणि त्याने रागाने कर्णाला शाप दिला. ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला आणि सांगितले की, ज्याप्रमाणे तू असहाय्य गाईला मारले आहेस, त्याचप्रमाणे तूही असहाय्य अवस्थेत मरशील. मृत्यूच्या निर्णायक क्षणी तुला असहाय्य वाटेल.

तिसरा शापही ब्राह्मणाचा होता

या संदर्भात ब्राह्मणाने आणखी एक शाप दिला होता की, रथावर स्वार होऊन तू ज्या प्रमाणे स्वतःला श्रेष्ठ समजतो तसेच  कसलाही विचार न करतांवर बाण मारते. जेव्हा तू जीवनाची निर्णायक लढाई लढत असशील तेव्हा तुझ्या रथाचे चाक जमिनीत रूतेल आणि श्रेष्ठतेच्या उंचीवरून तू खाली पडशील.

कर्ण जेव्हा महाभारताची निर्णायक लढाई लढत असतो तेव्हा त्याचे रथाचे चाक जमिनीत अडकते आणि त्याला रथातून खाली उतरावे लागते आणि स्वतः रथाचे चाक जमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याच वेळी अर्जुन दिव्यशास्त्र सुरू करतो आणि कर्णाला वीरगती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....