AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच पांडवांकडून शिकू शकता जीवनातले पाच मंत्र, यशस्वी होण्यासाठी आहे महत्त्वाचे

सर्वच धार्मिक ग्रंथ आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवतात, परंतु आपण आपल्या वेद, पुराण आणि धार्मिक ग्रंथांमधून काय शिकायचे ते आपल्यावर अवलंबून असते.

पाच पांडवांकडून शिकू शकता जीवनातले पाच मंत्र, यशस्वी होण्यासाठी आहे महत्त्वाचे
पांडवImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 3:03 PM

मुंबई : श्रीमद भागवत गीता हे जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. जाणकारांच्या मते गीतेमधून बरेच काही शिकता येते.  सर्वच धार्मिक ग्रंथ आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवतात, परंतु आपण आपल्या वेद, पुराण आणि धार्मिक ग्रंथांमधून काय शिकायचे ते आपल्यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे महाभारतातूनही खूप काही शिकण्यासारखे आहे. महाभारतातील (Mahabharta Story) पांडवांच्या जीवनातील घटनांमधून आपण अनेक गुण शिकू शकतो. त्यावेळच्या घटनांचा वर्तमानाच्या संदर्भात विचार केला तर अनेक समस्यांवर उपाय सापडू शकतात. महाभारताची प्रत्येक कथा आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवते.

पांडवांमधले हे पाच गुण यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत

1. संयम आणि धैर्य

पांडवांनी संयमाने आणि धैर्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना केला. लक्ष्य टाळणे असो किंवा कौरवांसमोर दुर्बल असूनही युद्धाचे आव्हान स्वीकारणे असो. त्यांनी धैर्याने आणि संयमाने युद्ध जिंकले.

2. कठीण परिस्थितीशी जुळवून घ्या

वनवासाच्या कठीण परिस्थितीत पाच पांडवांनी स्वतःला बळकट केले. ते जिथे गेला तिथे त्यांना लोकांची साथ मिळाली, यामध्ये त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाची महत्त्वाची भूमीका होती. म्हणूनच कौशल्य असल्यास प्रतिकूल परिस्थितीही अनुकूल बनवता येते.

हे सुद्धा वाचा

3. कौटुंबिक ऐक्य

आपण पाच पांडवांच्या जीवनातून एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि एकता शिकू शकतो. पांडव नेहमी एकत्र आणि एकोप्याने राहत. यामुळे पाच पांडवांनी 100 कौरवांचा पराभव केला.

4. सकारात्मक विचार

सकारात्मक विचाराने मातीचेही सोने होते. जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये राज्याची विभागणी झाली तेव्हा पांडवांना उजाड खांडव वन देण्यात आले. पण पांडवांनी हेही सकारात्मकतेने घेतले आणि जंगलात इंद्रप्रस्थासारखे सुंदर शहर वसवले.

5. सर्वांशी सौजन्य

पाच पांडव सर्वांशी नम्र होते आणि त्यांनी कधीही कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी धृतराष्ट्राला वडिलांचा मान दिला. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य यांच्याबद्दल नेहमीच आदर दाखवला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.