रावणाचा वध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी महादेवाला या स्तुतीने केले होते प्रसन्न, शिव रुद्राष्टक स्तोत्राबद्दल जाणून घ्या!
भगवान शिवला देवांचा देव महादेव म्हणतात. असे म्हटले जाते की, कोणत्याही भक्ताने त्यांची मनापासून पूजा केल्यास महादेव त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक पाठ आणि स्तुती आहेत. त्यातील एक म्हणजे 'शिव रुद्राष्टक स्तोत्र'.
मुंबई : भगवान शिवला देवांचा देव महादेव (Mahadev) म्हणतात. असे म्हटले जाते की, कोणत्याही भक्ताने त्यांची मनापासून पूजा केल्यास महादेव त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक पाठ आणि स्तुती आहेत. त्यातील एक म्हणजे ‘शिव रुद्राष्टक स्तोत्र’. श्री रामचरितमानसमध्ये लिहिलेले हे स्तोत्र अत्यंत शक्तिशाली मानले जाते.
हे स्तोत्र सर्व समस्या दूर करण्यास मदत करते
शिव रुद्राष्टक स्तोत्राबद्दल असे मानले जाते की, या स्तोत्राचा रोज पाठ केल्यास सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. श्रावण, त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी या विशेष फल प्राप्त होते. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला शत्रूंचा त्रास होत असेल आणि त्याने कुशाच्या आसनावर सलग 7 दिवस बसून ही अद्भुत स्तुती पूर्ण भक्तीभावाने केली तर महादेव नक्कीच आपल्या भक्ताचे रक्षण करतात आणि शत्रूंचा नाश करतात.
हे आहे शिव रुद्राष्टक स्तोत्र
नमामीशमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्
निराकारमोङ्करमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपारं नतोऽहम्
तुषाराद्रिसंकाशगौरं गभिरं मनोभूतकोटिप्रभाश्री शरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा
चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि
प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशं त्र्यःशूलनिर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम्
कलातीतकल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसंदोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी
न यावद् उमानाथपादारविन्दं भजन्तीह लोके परे वा नराणाम् न तावत्सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं
न जानामि योगं जपं नैव पूजां नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्मदुःखौघ तातप्यमानं प्रभो पाहि आपन्नमामीश शंभो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भुः प्रसीदति
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन हे प्रसिध्द करण्यात आले आहे.)
संबंधित बातम्या :
पौष महिन्यातील रविवारी या प्रकारे करा सूर्यदेवाची पूजा, धन-समृद्धीची कमतरता होणार नाही!
शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शनिवारचे व्रत ठेवा, पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या!