Importance of Bhasma : महादेवाला का प्रिय आहे भस्म, हे आहे त्यामागचे कारण

एक आख्यायिका प्रचलित आहे की जेव्हा सतीने रागाच्या भरात स्वत:ला अग्नीच्या स्वाधीन केले होते, त्या वेळी महादेव तिच्या मृतदेहासह पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र फिरत होते. त्यांची अवस्था भगवान विष्णू यांना पाहावली नाही..

Importance of Bhasma : महादेवाला का प्रिय आहे भस्म, हे आहे त्यामागचे कारण
भस्म आरतीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 9:46 AM

मुंबई : शिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात आवडता दिवस मानला जातो आणि श्रावण महिन्यात येणारी शिवरात्री अतिशय विशेष मानली जाते. शिवरात्रीच्या दिवशी भाविक शिवलिंगावर भस्म (Importance of Bhasma), बेलपत्र आणि भांग अर्पण करतात. भगवान शिव हे सर्व देवी देवतांमध्ये अतिशय वेगळे आहेत. त्यांच्या आवडी निवडी आणि श्रृंगारही इतरांपेक्षा वेगळा आहे. भगवान शिव यांना भस्म प्रिय आहे. भस्माला भगवान शिव यांचा अलंकार मानल्या जाते. पण, भगवान शिव अंगावर भस्म का लावतात. यामागचे काही पौराणिक कथा आहे. त्या आपण जाणून घेऊया.

भगवान शिवाच्या शिवाला भस्म लावण्याचे कारण

भगवान शिव आपल्या शरीरावर भस्म लावतात.  शिवभक्त ते भस्म टिळा म्हणूनही लावतात. भगवान शिव शरीरावर भस्म का वापरतात याचा उल्लेख शिवपुराणात आहे.

एक आख्यायिका प्रचलित आहे की जेव्हा सतीने रागाच्या भरात स्वत:ला अग्नीच्या स्वाधीन केले होते, त्या वेळी महादेव तिच्या मृतदेहासह पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र फिरत होते. त्यांची अवस्था भगवान विष्णू यांना पाहावली नाही  त्यांनी माता सतीच्या पार्थिवाला स्पर्श केरून त्याचे राखेत रूपांतर केले. महादेवाच्या हातात फक्त राख राहिली. हातातील राख पाहून शिवजी अस्वस्थ झाले आणि त्यांनी ती राख सतीच्या स्मरणार्थ अंगावर लावली.

हे सुद्धा वाचा

धर्मग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की भगवान शिव कैलास पर्वतावर वास करत होते. तिथे खूप थंडी होती. अशा परिस्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी ते अंगावर राख लावायचे. आजही बेल, मदारची फुले आणि दूध अर्पण करण्याव्यतिरिक्त जवळपास प्रत्येक शिवमंदिरात भस्म आरती केली जाते.

दुसरी कथा

आणखी एक प्रचलित कथा आहे, तिचा उल्लेख शिवपुराणातही आहे. पौराणिक कथेनुसार, एक साधू होता जो खूप तपश्चर्या करून शक्तिशाली बनला होता. तो फक्त फळे आणि हिरवी पाने खात असे म्हणून त्याचे नाव ‘प्राणद’ असे ठेवले. त्या साधूने आपल्या तपश्चर्येने जंगलातील सर्व प्राण्यांवर ताबा मिळवला होता. एकदा एक साधू आपली झोपडी दुरुस्त करण्यासाठी लाकूड कापत असताना त्याचे बोट कापले गेले. बोटातून रक्ताऐवजी रस निघत असल्याचे साधूने पाहिले.

साधूला वाटले की तो इतका शुद्ध झाला आहे की त्याचे शरीर रक्ताने नाही तर वनस्पतींच्या रसाने भरले आहे. यामुळे त्याला खूप आनंद झाला आणि तो अभिमानाने भरला. या घटनेनंतर साधू स्वत:ला जगातील सर्वात धार्मिक व्यक्ती समजू लागला. हे पाहून भगवान शंकरांनी वृद्धाचे रूप धारण केले आणि ते तेथे पोहोचले. म्हातार्‍याच्या वेशात भगवान शिवाने ऋषींना विचारले, ‘तो इतका आनंदी का आहे?’ साधूने कारण सांगितले. सर्व काही जाणून देवाने त्याला विचारले की हा फक्त वनस्पती आणि फळांचा रस आहे, परंतु जेव्हा झाडे आणि वनस्पती जळून जातात तेव्हा ते देखील राख होतात. शेवटी फक्त राख उरते.

भगवान शिवाने वृद्धाचे रूप धारण केले आणि लगेचच त्याचे बोट कापले आणि मग त्यातून राख निघाली. त्या साधूला जाणवले की स्वतः भगवान त्याच्यासमोर उभे आहेत. ऋषींनी आपल्या अज्ञानाबद्दल क्षमा मागितली. असे म्हणतात की तेव्हापासून भगवान शिवांनी आपल्या भक्तांना हे नेहमी लक्षात राहावे म्हणून त्यांच्या शरीरावर भस्म लावायला सुरुवात केली. शारीरिक सौंदर्याचा अभिमान बाळगू नका, अंतिम सत्य नेहमी लक्षात ठेवा असा संदेश यातून मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.