Maharana Pratap Jayanti 2023 : महाराणा प्रताप का ठेवायचे एका म्यानमध्ये दोन तलवार? महाराजां विषयी महत्त्वाची माहिती
महाराणा प्रताप यांनी कधीही शिष्टाचार मोडला नाही. हल्दीघाटीच्या लढाईच्या पहिल्या संध्याकाळी जेव्हा हेरांना माहिती मिळाली की मानसिंग काही साथीदारांसह शोधावर आहे आणि जवळजवळ निशस्त्र आहे, तेव्हा प्रताप म्हणाले की..
मुंबई : मेवाडचे शूर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीबाबत (Maharana Pratap Jayati 2023) अनेक मतप्रवाह आहेत. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार काही ठिकाणी महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे रोजी साजरी केली जाते, तर हिंदू दिनदर्शिकेनुसार विक्रम संवत 22 मे रोजी त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे. महाराणा प्रताप हे असे शूर योद्धे होते ज्यांनी मुघलांच्या मुसक्या अवळल्या होत्या आणि अकबराला गुडघे टेकण्यास भाग पाडले.असे म्हणतात की महाराणा प्रताप दोन तलवारी, 72 किलो वजनाचे चिलखत आणि 80 किलो वजनाचा भाला घेऊन रणांगणात उतरायचे. चला जाणून घेऊया महाराणा प्रताप यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी.
महाराणा प्रताप यांना ‘कीका’ म्हणत
हिंदू दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्म गुरु पुष्य नक्षत्रात ज्येष्ठ महिन्याच्या तिसऱ्या दिवशी झाला होता. या दिवशी मेवाडमधील कुंभलगड येथील राजपूत राजघराण्यात उदयसिंह आणि माता राणी जयवंत कंवर यांच्या पोटी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना किका या नावानेही हाक मारली जायची. खरं तर, बालपणात, महाराणा प्रताप यांचे आयुष्य भिल्लांमध्ये दीर्घकाळ राहिले, त्या वेळी भिल्ल त्यांच्या मुलाला कीका म्हणून संबोधत असत. त्यामुळेच महाराणा प्रताप यांना भिल्ल असेही संबोधले जात होते. लहानपणापासून महाराणा प्रताप घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात निपुण होते.
महाराणा प्रताप यांचा अप्रतिम चेतक घोडा
महाराणा प्रताप यांचा घोडा, चेतक, त्याच्या स्वामीच्या निष्ठेसाठी ओळखला जातो. चेतक हा अतिशय हुशार आणि शक्तिशाली घोडा होता. चेतकच्या तोंडासमोर हत्तीची सोंड ठेवण्यात आली होती जेणेकरून युद्धात शत्रूला चकवा देता येईल. जेव्हा मुघल सैन्य महाराणा प्रतापांच्या मागे जात होते, तेव्हा प्रतापला पाठीवर घेऊन चेतकने 26 फूट नाला पार केला, जो मुघलांना पार करता आला नाही. हल्दीघाटी युद्धात चेतक गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आज त्याच रणभूमीजवळ चेतकचे मंदिर बांधण्यात आले आहे.
दोन तलवारी ठेवण्याचे रहस्य
महाराणा प्रताप यांचे वैशिष्ट्य होते की ते नेहमी दोन तलवारी आपल्या खास म्यानात ठेवत, एक स्वत:साठी आणि दुसरी शत्रूसाठी. नि:शस्त्र शत्रूवर कधीही हल्ला करू नका, असा सल्ला त्यांना त्यांच्या आई जयवंताबाईंनी दिला होता. त्याला तुमची अतिरीक्त तलवार द्या आणि पुन्हा आव्हान द्या.
निशस्त्र शत्रूवर हल्ला केला नाही
महाराणा प्रताप यांनी कधीही शिष्टाचार मोडला नाही. हल्दीघाटीच्या लढाईच्या पहिल्या संध्याकाळी जेव्हा हेरांना माहिती मिळाली की मानसिंग काही साथीदारांसह शोधावर आहे आणि जवळजवळ निशस्त्र आहे, तेव्हा प्रताप म्हणाले की भ्याड निशस्त्रांवर हल्ला करतात, आम्ही योद्धा आहोत, उद्या हल्दीघाटीमध्ये मानसिंगचा शिरच्छेद केला जाईल. महाराणा प्रताप यांनी त्यांच्या सैन्यात धर्माला कधीच महत्त्व दिले नाही, त्यांच्या प्रचंड सैन्यात भिल्लांपासून ते मुस्लिमांचा समावेश होता.
महाराणा प्रताप यांचे कुटुंब
महाराणा प्रताप यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी एकूण 11 लग्ने केली होती. राजकीय कारणांमुळे झालेल्या या विवाहांमध्ये त्यांना 17 मुले आणि 5 मुली झाल्या. महाराणा प्रताप गेल्यानंतर त्यांची पहिली पत्नी अजबदे पनवार यांचा मुलगा अमरसिंह याने गादी ताब्यात घेतली.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)