Mahashivratri 2024 Date Shubh Muhurt : महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि व्रत बद्दल घ्या सविस्तर जाणून
संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतोय. महाशिवरात्रीच्या पूजेबद्दल आणि शुभ मुहूर्तबद्दल जाणून घ्या सविस्तर. या महाशिवरात्रीला खूप मोठे महत्व आहे. भाविक मनोभावे या दिवशी महादेवाची पूजा करताना देखील दिसतात. चला तर मग जाणून घ्या पूजा करण्याचे शुभ मुहूर्त
मुंबई : दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरात्री हा शिवाच्या दैवी आणि चमत्कारिक कृपेचा महान उत्सव आहे. संपूर्ण देशभरात 8 मार्चला मोठ्या उत्साहात महाशिवरात्री ही साजरी केली जाणार आहे. जोरदार तयारी करतानाही भाविक दिसत आहेत. काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणात देखील महाशिवरात्रीनिमित्त भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. असे सांगितले जाते की, शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या व्यक्तीला महादेवाचा आशिर्वाद मिळतो, त्याचे जीवन आनंदाने भरून जाते.
महाशिवरात्रीला खूप जास्त महत्व आहे. यादिवशी भाविक हे महादेवाची पूजा अर्चना करताना देखील दिसतात. संपूर्ण दिवसभर उपवास देखील ठेवला जातो. हिंदू परंपरानुसार या दिवशी भगवान शिव प्रकट झाले. या दिवशी शिवजीचा विवाह ही मानला जातो. या दिवशी उपवास, मंत्र आणि रात्रीच्या जागराला विशेष महत्त्व देखील आहे.
शिवरात्रीचा प्रत्येक प्रहर हा अत्यंत शुभ मानला जातो. शिवरात्रीला महादेव आणि पार्वतीची विशेष पूजा ही केली जाते. विधिवत पूजा आणि अर्चना करणाऱ्या भक्तांना वरदान मिळते. ही महाशिवरात्रीची पूजा ही चार प्रहरामध्ये केली जाते. 8 मार्चला पूजेचा पहिला प्रहर म्हणजे सायंकाळी 06.25 ते रात्री 09.28 वाजेपर्यंत. दुसरा प्रहार 9 मार्च रोजी रात्री 9.28 ते 12.31. तिसरा प्रहार पूजेची वेळ 9 मार्च मध्यरात्री 12.31 ते 03.34. चतुर्थ प्रहार पूजेची वेळ 9 मार्च रोजी सकाळी 03.34 ते 06.37.
यावेळी महाशिवरात्रीला ग्रह पाच राशींमध्ये असतील. मकर राशीत चंद्र आणि मंगळ एकत्र असतील. यावेळी शिवरात्रीला आर्थिक अडथळे दूर होऊ शकतात. चंद्र आणि गुरूचे वर्चस्व देखील शुभ परिस्थिती निर्माण करत आहे. यामुळे यंदाच्या शिवरात्रीमध्ये नोकरीची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. शिवरात्रीचे व्रत विविध पद्धतीने केले जाते.
महाशिवरात्रीला निर्जल उपवास करणे किंवा फळ खाऊन उपवास करणे चांगले मानले जाते. बरेच लोक हे शिवरात्रीला शक्यतो निर्जल उपवास ठेवतात. सकाळी लवकर उठून अंघोळ करून शुभ्र वस्त्र घालून दिवसाची सुरूवात करा. आपल्या जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात पंचामृत आणि गंगाजलने अभिषेक करा.