Horoscope 10 May 2022 : राजकीय व्यक्तीशी भेट फायदेशीर, घरातील वातावरण आरामदायक

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Horoscope 10 May 2022 : राजकीय व्यक्तीशी भेट फायदेशीर, घरातील वातावरण आरामदायक
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 5:10 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

तुळ –

आज ग्रहस्थिती असा संदेश देत आहे की स्वतःबद्दल विचार करा आणि स्वतःसाठी काम करा. कोणत्याही कौटुंबिक वादाचे निराकरण अनुभवी व्यक्तीच्या मध्यस्थीने होईल आणि परस्पर संबंधांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. योजना कृतीत आणण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमच्या स्वभावात अहंकाराची भावना येऊ देऊ नका. अचानक असे काही खर्च येतील जे कमी होण ही शक्य होणार नाही. आर्थिक अडचणी कायम राहतील. व्यवसायात काही आव्हाने येतील. फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष आणि मेहनत करावी लागेल. एखाद्या महत्त्वाच्या किंवा राजकीय व्यक्तीशी झालेली भेट फायदेशीर ठरेल.

लव फोकस – नोकरीत चाललेल्या त्रासाचा प्रभाव कौटुंबिक जीवनावर देखील पडेल. अशावेळी धैर्य आणि संयम ठेवणं गरजेचं आहे.

खबरदारी –मज्जातंतूंचा ताण आणि वेदनांचा त्रास वाढू शकतो. कामासोबतच विश्रांती घेणं गरजेचं. 

शुभ रंग – केसरी भाग्यवान अक्षर – अनुकूल क्रमांक – 9

वृश्चिक –

ग्रहमान चांगले आहे. महत्वपूर्ण योजना आमलात आणण्यासाठी योग्य वेळ आहे. घरातील सदस्यांसोबत चर्चा विचार करणं तुमच्यासाठी सुखद राहिल. योग्य समाधान मिळेल. घर किंवा गाडी घेण्याची व्यवहारा संबंधित कोणतीही योजना होत असेल तर, त्यावर योग्य चर्चा करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पैशाच्या व्यवहाराबाबत कोणाशी तरी गैरसमज होऊ शकतात. व्यवसायात तुमच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी घरातील वरिष्ठांशी सल्लामसलत करा. नक्कीच योग्य तोडगा निघेल. आणि लवकरच त्याचे फायदेशीर परिणामही समोर येतील.

लव फोकस -घरातील वातावरण अतिशय आरामदायक असेल. प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात करण्याची योजना आखली जाईल. खबरदारी – आरोग्य उत्तम राहील. जास्त कामामुळे डोक्याला जडपणा जाणवेल. शुभ रंग – सफेद भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 8

धनु –

दैनंदिन थकवा दूर करण्यासाठी आज मनोरंजक आणि वैयक्तिक कामात वेळ घालवाल. ज्यामुळे तुम्ही स्वतःला एनर्जेटीक रहाल. सामाजिक कार्यातही व्यस्त राहाल. काही लोक रागाने तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात. पण यागोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करून तुमच्या कामात आनंदाने राहावे. इतरांच्या बाबतीत तुम्ही तुमचे मत मांडत नसाल तर ये योग्य राहिल. मीडिया आणि ऑनलाइन कामाशी संबंधित व्यवसाय फायदेशीर ठरतील. तुमच्या मेहनतीचे फळ चांगले मिळेल. फोनद्वारे आपल्या पक्षांच्या संपर्कात रहा. सरकारी नोकरदारांना आजही कामाची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते.

लव फोकस – वैवाहिक जीवन सुखाचे. प्रेमप्रकरणात भेटीचे योग.

शुभ रंग – लाल भाग्यवान अक्षर – ब अनुकूल क्रमांक – 3

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.