माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे बदल करा आणि तत्काळ फळ मिळवा!
माता लक्ष्मी ही संपत्ती आणि वैभवाची देवी मानली जाते. असे मानले जाते की ज्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. पण जर माता लक्ष्मी नाराज झाली तर त्या व्यक्तीला गरिबी सहन करावी लागते. यासोबतच जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
मुंबई : माता लक्ष्मी ही संपत्ती आणि वैभवाची देवी मानली जाते. असे मानले जाते की ज्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. पण जर माता लक्ष्मी नाराज झाली तर त्या व्यक्तीला गरिबी सहन करावी लागते. यासोबतच जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकवेळा आपल्याकडून नकळत झालेल्या चुकांमुळे माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे कुटुंबाला गरिबी आणि अडचणींचा सामना करावा लागतो. जाणून घ्या त्या चुकांबद्दल.
या सवयी सुधारणे आवश्यक आहे
1. रोज सकाळी उशिरा उठल्यास घरामध्ये गरिबी येते. सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजा करून घरात दिवा लावावा.
2. घरातील झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. कारण झाडू घरातील घाण दूर करतो. झाडू अशा जागी ठेवावा की बाहेरचे कोणी पाहू शकणार नाही.
3. जर तुमच्या घरात कोणतेही घड्याळ पडून असेल तर ते ताबडतोब चालू करा किंवा समोरून काढून टाका. यामुळे घरात नकारात्मकता येते आणि अनेक समस्या निर्माण होतात.
4. जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्याची नियमित पूजा करावी. पूजा केली नाही तर देवी लक्ष्मी कोपते कारण श्री यंत्र मातेला खूप प्रिय आहे.
या गोष्टी नियमित करा
1. गरीब मुलींना संधी मिळेल तेव्हा मदत करा. त्यांच्या लग्नात, अभ्यासात त्यांना मदत करा. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
2. कापूर आणि लवंगाने घरी संध्याकाळची आरती करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.
3. आठवड्यातून एकदा तरी मीठाने घर पुसा. यामुळे नकारात्मकता दूर होण्यासोबत घरातील आजारही कमी होतात.
4. पहिली चपाती गायीला खायला द्या. याशिवाय कोणत्याही गरजूंना अन्नदान करा. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
संबंधित बातम्या :