Mokshada Ekadashi 2021| मोक्षदा एकादशी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या विधी, महत्त्व
आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे, या दिवसाला 'मोक्षदा एकादशी' म्हणतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते.
मुंबई : आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे, या दिवसाला ‘मोक्षदा एकादशी’ म्हणतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात श्रीमद भगवदत गीता हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुराणात अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली आहे. या ग्रंथाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते.गीतेची शिकवण माणसाला वास्तवाची जाणीव करून देऊन त्याला जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करते म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला हा सण साजरा केला जातो. या प्रसंगी आज विठ्ठल मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे.
मोक्षदा एकादशीच्या व्रताची कथा आख्यायिका युधिष्ठिराला भगवान कृष्णाकडून मोक्षदा एकादशीच्या व्रताची कथा जाणून घ्यायची होती, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला मोक्षदा एकादशीच्या व्रताची कथा सांगितली. या वेळी कृष्णाने युधिष्ठिराला एक कथा सांगितली, चंपकनगराचा राजा वैखानस याल एक दिवशी स्वप्न पडले. त्यामध्ये त्यांचे पूर्वज नरकात असून ते तेथून निघण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे स्वप्न पाहिल्यानंतर राजा व्यतीत होतो आणि दुसऱ्या दिवशी ब्राम्हणांकडे जातो. आणि त्यांना हे स्वप्न सांगतो आणि त्यांच्या कडून सल्ला मगतो.
पण ब्राम्हण मात्र त्यांची समस्या सोडवण्यास असाह्य होतात मग ते त्यांना जवळच्या ऋषीची माहीती देतात. ते त्यांना सांगतात की, ज्ञानी ऋषीच तुमची समस्या दुर करु शकतात. हे ऐकून राजा त्या ऋषीजवळ जातो आणि त्यांना त्यांचे दु: ख सांगितले वैखानस राजाचे म्हणणे ऐकून ऋषी म्हणाले की, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत पुण्यकारक आणि मोक्ष देणारे आहे. या एकादशीचे व्रत करावे. या दिवशी उपवास करून दानधर्म करावा. या व्रताचे पुण्य आपल्या पितरांना दान करा. असे केल्याने तुमच्या पूर्वजांना मोक्ष मिळेल आणि ते नरकातून बाहेर पडतील. ऋषींच्या म्हणण्यानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे आगमन झाल्यावर राजाने नियमानुसार उपवास केला. भगवान विष्णूची पूजा करून दान केले. नंतर एकादशीचे पुण्य पितरांना दान केले. त्यामुळे त्या राजाच्या सर्व पूर्वजांना मोक्ष प्राप्त झाला.
विष्णु मंत्र 1. धन और समृद्धि के लिए ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि। ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।
2. विष्णु गायत्री मंत्र: सुख और शांति के लिए ऊं नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
संबंधित बातम्या
Zodiac | ‘कठोर परिश्रम’ हीच या राशींच्या व्यक्तींची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?