Money attraction: कुटुंबातल्या गेलेल्या व्यक्तींचे फोटो पाकिटात ठेवता?; मग ‘हे’ नक्की वाचा!

कुटुंबातील मृत व्यक्ती अनेकदा आपल्या जवळची असते. अशावेळी त्यांची आठवण राहावी म्हणून आपण त्यांचा फोटो आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवतो, पण...

Money attraction: कुटुंबातल्या गेलेल्या व्यक्तींचे फोटो पाकिटात ठेवता?; मग 'हे' नक्की वाचा!
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 2:00 PM

स्त्री असो वा पुरुष प्रत्येकच जण पर्सचा वापर करतात. पर्सचा किंवा पाकिटाचा उपयोग पैसे आणि महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी असतो, पण अनेक जण त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवतात. अनेकांच्या पाकिटात तर पैसे कमी आणि बाकीचाच पसारा जास्त असतो. त्याचा त्यांना त्रासही होतो. कळतं पण वळत नाही अशातला हा भाग आहे. नकळत आपण पर्समध्ये अशा काही वस्तू ठेवतो ज्याची आपल्याला गरज तर नसतेच शिवाय त्या वस्तूंच्या नकारात्मक ऊर्जेमुळे (Negative energy) समस्येचा सामना करावा लागतो (Money attraction). तसेच काही वस्तू पर्स किंवा पाकिटात ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने अनेक समस्यांना समोर जावे लागते (shortage of money). प्रत्येक वास्तूला स्वतःची ऊर्जा असते. नकारात्मक ऊर्जा असलेल्या वस्तू पर्समध्ये जास्त असेल तर त्या सकारात्मक ऊर्जेसाठी (positive energy) बाधा निर्माण करतात. या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या पर्स किंवा पाकिटात ठेवणे अशुभ का मानले जाते त्याबद्दल जाणून घेऊया.

 जाणून घेऊया पर्स किंवा पाकिटामध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते.

  1. अनेकांना अशी सवय असते की, खरेदी केल्यानंतर ते बिल पर्समध्ये ठेवतात. तसेच त्या बिलाचे काम झाल्यानंतरही ते पर्समध्ये किंवा पाकिटात तसेच पडून असते. कुठल्याही प्रकारच्या बिलामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. ती ऊर्जा आपल्या पर्समध्ये साठवून ठेवतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जेसाठी ती बाधा निर्माण करते.
  2. अनेक जण पर्स किंवा पाकिटात नोटा घड्या करून किंवा चोळामोळा करून ठेवतात. हा पैशांचा अपमान आहे. यावरून असे दिसते की, आपल्याला पैशांची किंमत नाही. अशा लोकांवर लक्ष्मी कधीच प्रसन्न राहत नाही. आर्थिक तंगीचे हे सर्वात मोठे कारण आहे.  पर्समध्ये कधीही अशी चित्रे ठेवू नका, ज्यामध्ये राग, मत्सर, विरोध या भावना दिसतील. तसेच, अशी चित्रे घरातही लावू नका, कारण ते आपल्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
  3. कुटुंबातील मृत व्यक्ती अनेकदा आपल्या जवळची असते. अशावेळी त्यांची आठवण राहावी म्हणून आपण त्यांचा फोटो आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवतो, पण  वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कुटुंबातील मृत व्यक्तीचे फोटो कधीही ठेवू नये. असे केल्याने माणूस कर्जबाजारी बनतो. 
  4. देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावर कायम असावा यासाठी बरेच जण देवी देवतांचा फोटो पर्समध्ये ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. कारण पर्स किंवा पाकीट घेऊन आपण अनेक ठिकाणी वावरतो. कधी कधी घाणेरड्या हातांनीही पर्सला हात लावावा लागतो. हे चुकीचे आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जे पैशांच्या तंगीचे कारण बनू शकते.(वरील माहिती वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)
  5. हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.