प्रयागराजच्या या पाच पवित्र घाटांवर स्नान करतील साधू आणि ऋषीमुनी, जाणून घ्या या पवित्र घाटांचे महत्त्व

प्रयागराज भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे. जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम आहे. हे शहर धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते आणि येथे दर बारा वर्षांनी महा कुंभमेळा भरतो. महा कुंभमेळ्याच्या काळात देश विदेशातून लाखो भाविक येथे येतात आणि या पवित्र घाटांवर स्नान करतात. प्रयागराजच्या त्या पाच पवित्र घाटाबद्दल जाणून घेऊन जिथे संत आणि ऋषींची प्रचंड गर्दी असते.

प्रयागराजच्या या पाच पवित्र घाटांवर स्नान करतील साधू आणि ऋषीमुनी, जाणून घ्या या पवित्र घाटांचे महत्त्व
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 3:56 PM

13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महा कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कुंभमेळा 45 दिवस चालणार आहे. यामध्ये सहा शाही स्नान होणार आहेत. पौष पौर्णिमेला पहिले शाही स्नान होईल. तर 26 फेब्रुवारीला शेवटच्या शाही स्नानाने महा कुंभाची सांगता होणार आहे. महा कुंभाच्या वेळी भाविक आणि संतांचा मोठा मेळावा भरणार आहे. प्रयागराजच्या पाच प्रमुख घाटांबद्दल जाणून घेऊया जिथे शाही स्नान केले जाणार आहे.

संगम घाट

हा घाट प्रयागराजचा सर्वात पवित्र घाट मानला जातो. संगम म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम. यामुळेच लोक याला त्रिवेणी घाट या नावाने ओळखतात. असे मानले जाते की जो कोणी या ठिकाणी श्रद्धेने स्नान करेल त्याची सर्व पाप नष्ट होतात. संगम घाटावर श्रद्धेने स्नान करणाऱ्यांना अलौकिक अनुभव मिळतो असे देखील मानले जाते.

हे सुद्धा वाचा

अराइल घाट

अध्यात्माच्या मार्गावर असणारे लोक या घाटावर येतात. त्यामुळे या घाटावर भाविकांची संख्या कमी असते. ध्यान, प्रगती आणि योगाच्या दृष्टीने हा घाट अतिशय खास आहे. एवढेच नाही तर या घाटावर स्नान करणाऱ्यांना शुभ फळ मिळते. ज्यांना गर्दी पासून दूर राहायला आवडते त्यांच्यासाठी हा घाट अतिशय उत्तम आहे.

रामघाट

हा घाट ऐतिहासिक आहे. या घाटावर होणारी सायंकाळची आरती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. स्नान करण्यासोबतच येथे बोटिंगचा आनंद घेता येतो. हा घाट संगम घाटाच्या अगदी जवळ आहे. हा घाट संगम घाटासारखा प्रसिद्ध आहे.

दशाश्वमेध घाट

याचे नाव अश्वमेध यज्ञाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. अश्वमेध यज्ञ हा तोच यज्ञ मानला जातो जो राजा भगीरत यांनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी केला होता. त्यामुळेच प्रयागराजच्या प्रमुख घाटांमध्ये या घाटाची गणना केली जाते. या ठिकाणी श्रद्धेने स्नान करण्यासाठी भाविक जात असतात.

लक्ष्मी घाट

या घाटावर सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. या घाटावर संपत्ती आणि समृद्धीचे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. महा कुंभमेळ्याच्या काळातही भाविक या घाटावर पूजा करताना दिसतात. संगम सह सर्व घाट संत भक्तांच्या गर्दीने गजबजलेले असतात. येथे संत आणि भक्त स्नान करतात. असे मानले जाते की महा कुंभमेळ्याच्या वेळी पवित्र नद्यांचे पाणी अमृत होते. त्यामुळेच संत भक्त महा कुंभमेळ्याच्या वेळी घाटावर श्रद्धेने स्नान करताना दिसतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.