या मंदिरासमोर औरंगजेबाला घासवे लागले नाक, तोडण्यासाठी आला नि सैन्याचे झाले असे हाल, मग पुढे झाले काय?
Aurangzeb not destroy this temple : छावा चित्रपटाने औरंगजेब किती क्रूर शासक होता हे दाखवून दिले. औरंगजेब हा धर्मांध होता, याचे इतिहासात दाखलेच दाखल आहेत. त्याच्या शासन काळात अनेक मंदिरे पाडण्यात आली. त्याचे सुद्धा दाखल इतिहासकार देतात. पण या मंदिरासमोर त्याला गुडघे टेकावे लागेल.

छावा चित्रपटाच्या माध्यमातून स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचे हौत्मात्य उभ्या जगाला कळले. ते यापूर्वी पुस्तकातून मांडले गेले होते. औरंगजेब हा क्रूर शासक होता याचे दाखले इतिहासात पानो पानी मिळतात. कोणी जर औरंगजेब हा कुशल शासक होता, असे म्हणत असेल तर हे महिमामंडन तो कोणत्या विचारधारेशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करतो हे दाखवते. औरंगजेबाने त्याच्या सत्ता काळात 1000 हून अधिक मंदिर पाडल्याचा दावा करण्यात येतो. त्यातील अनेक मंदिरे तोडून तिथे त्याने मशिदी बांधल्या. पण देशात एका मंदिर तोडण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. नि घाबरून त्याने मंदिरासमोरच गुडघे टेकले. काय आहे या मंदिराचा इतिहास काय करण्यात येतो दावा? या दाव्याला कोणता आहे पुरावा?
मुघलांच्या वळचणीला बांधलेले काही इतिहासकार सर्वच मुघल शासक हे अत्यंत प्रेमळ, प्रजाहितैषी असल्याचा आवा आणतात. त्यात औरंगजेब हा तर त्यांच्या गळ्यातील ताईत आहे. औरंगजेब हा तसा पहिला तर अखेरचा एकहाती सत्ता ठेवणारा मुघल होता. त्यानंतर या सत्तेला घरघर लागली. औरंगजेबाने भारतावर 1658 ते 1707 असे राज्य केले. त्यातील 27 वर्षे मराठ्यांनी लढण्यात त्याने खर्ची घातली आणि मराठ्यांनीच त्याची माती केली. त्याचे थडगे छत्रपती संभाजीनगर जवळील खुलताबाद येथे मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते. तर त्याने अनेक मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. पण या मंदिरात त्याची काही टाप लागली नाही. त्याची डाळ शिजली नाही.
औरंगजेबाचे सैन्यचं पडलं बेशुद्ध




औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिरासह उत्तर भारतात मंदिर तोडण्याचे, पाडण्याचे आणि तिथे मशिदी उभारण्याचा उद्योग आरंभला होता. आपण धर्मांध आहोत, हे बिंबवण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याच दरम्यान तो चित्रकूट येथे पोहचला. त्याचा सेनापती आणि सैन्याने मंदाकिनी नदीच्या काठावरील रामघाटावरील मंदिराकडे मोर्चा वळवला.
मत्यगजेंद्रनाथ मंदिरातील शिवलिंगावर त्याच्या सैनिकांनी हतोडा मारला. असे मानले जाते की, ब्रह्म देवाने हे शिवलिंग स्थापित केले आहे. शिवलिंगावर हतोडा पडताच, औरंगजेबाचे सैन्य, सेनापती सर्वच बेशुद्ध झाले. एका दुताने औरंगजेबापर्यंत ही वार्ता आणली. हे दृश्य पाहताच औरंगजेबाला घाम फुटला. त्याने त्याच्या सहकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली.
बालाजी मंदिरात घेतली धाव
मत्यगजेंद्रनाथ मंदिराजवळील बालाजी मंदिराकडे सुद्धा त्याचे सैनिक गेले होते. पण सहकाऱ्यांनी सल्ला दिल्यावर औरंगजेब धावतच या मंदिरात पोहचला. तिथे त्यावेळी संत बालकदास हे पुजारी होते. औरंगजेबाने झालेला प्रकार कथन केला. संत बालक दास यांनी औरंगजेबाला उपाय सांगण्यासाठी त्याच्याकडून एक वचन घेतले. चित्रकूट येथील मंदिराला हात लावणार नाही, असे ताम्रपट लिहून देण्यास औरंगजेबाला सांगण्यात आले. औरंगजेब त्यासाठी तयार झाला.
असे टळले संकट
औरंगजेबाकडून ताम्रपट देण्यात आल्यावर संत बालकदास यांनी त्याला मंदिरातील उदी दिली. त्याला या परिसरापासून 10 किलोमीटर बाहेर जाण्यास सांगितले. औरंगजेबाने उदी डोक्याला लावताच सर्व सैन्य जागे झाले. औरंगजेबाने या मंदिराला हजारो एकर जमीन दान केली. मंदिर बांधण्यासाठी सुद्धा मोठा दान धर्म केला. ही घटना 1691 सालमधील असल्याचे मानले जाते. हे ताम्रपत्र आणि ही दोन्ही मंदिरं आज पण चित्रकुटमध्ये आहे. शिवलिंगावर हतोडीचा घाव पण आहे. ही सर्व माहिती सध्याचे महंत भुवनदास यांनी दिली आहे.