Mumbai Ganeshotsav 2022 : जाणून घ्या मुंबईतील 6 मानाच्या गणेशमंडळांबद्दल
आजपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022 ) सुरुवात झाली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळत आहे. गणेशाच्या आगमनाचा एक वेगळाच उत्साह असतो.
मुंबई : आजपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022 ) सुरुवात झाली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळत आहे. गणेशाच्या आगमनाचा एक वेगळाच उत्साह असतो. आज गणेशाच्या प्रतिष्ठापणेचा दिवस आहे. गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाचं (lalbag raja) दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तब्बल 10 ते 15 किलोमीटर दूरपर्यंत रांगा लावल्या आहेत. पहाटेपासून भविकांनी गर्दी केेली आहे. दुसरीकडे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक फुलांची अरास करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त जाणून घेऊयात मुंबईतील (Mumbai) सहा मानांच्या गणेशमंडळांबद्दल
मुंबईतील प्रमुख गणेशमंडळ
- मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती : गणेशगल्लीच्या गणपतीची मुंबईचा राजा अशी ख्याती आहे. मुंबईच्या राजानं यंदा काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. मुंबईचा राजा यंदा विश्वकर्मा रुपात पाहायला मिळतोय. यंदा या गणपतीची मूर्ती तब्बल 22 फूट उंच आहे.
- लालबागचा राजा : नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त रांगा लावतात. लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान होतो त्याच ठिकाणी बाप्पाची मूर्ती साकारली जाते. लालबागच्या राजाचं यंदाचं 89 वं वर्ष आहे.
- चिंचपोकळीचा चिंतामणी : चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा प्रसिद्ध असतो. बाप्पाच्या आगमनाच्या दोन महिने आधीपासूनच त्याची तयारी सुरु होते.
- खेतवाडीचा महाराजा : मुंबईचा महाराजा अशी ओळख असलेल्या खेतवाडीची यंदाची गणेशमूर्ती तब्बल 38 फुटांची आहे. खेतवाडी गणेशोत्सव मंडळ उंच गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मूर्तीसमोर गुरुकुलाचा देखावा साकारण्यात आलाय.
- जीएसबी गणपती : माटुंग्यातील जीएसबी सेवा गणेश मंडळाला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखलं जातं. या मंडळाने यंदा गणेशमूर्ती मंडप आणि इतर साहित्याचा तब्बल 300 कोटींचा विमा उतरवलाय. जीएसबीच्या गणेशमूर्तीला 68 किलो सोनं आणि 327 किलो चांदीने सजवण्यात आले आहे.
- तेजुकाय मेन्शन गणपती : लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर गणेशभक्त तेजुकाय मेन्शन गणपतीचं दर्शन घ्यायला जातात. तेजुकाय गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव असते. त्यामुळे ही गणेशमूर्ती अनेकांसाठी आकर्षण ठरते.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update