मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येलाच होणार वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण, या दिवशी 3 गोष्टी कराच
मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला विशेष महत्त्व आहे. शास्त्रात अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित केली आहे. या दिवशी पितरांशी संबंधित कोणतेही कार्य केल्या ते शुभ मानले जाते. या वर्षी ही अमावास्या ४ डिसेंबर रोजी येणार आहे.
मुंबई : मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला विशेष महत्त्व आहे. शास्त्रात अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित केली आहे. या दिवशी पितरांशी संबंधित कोणतेही कार्य केल्या ते शुभ मानले जाते. या वर्षी ही अमावास्या ४ डिसेंबर रोजी येणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान, दान इत्यादी केल्याने पाप नष्ट होते. ही अमावस्या तिथी 03 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 04:58 पासून सुरू होईल आणि 04 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 01:15 पर्यंत राहणार आहे. आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी 3 गोष्टी नक्की करा. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
स्नान करून नारायणाचे ध्यान करावे अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे. परंतु जर तुम्ही स्नानासाठी नदीच्या काठावर जाऊ शकत नसाल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल ओतून त्यामध्ये सामान्य पाणी मिसळून स्नान करावे. स्नानानंतर देवाची पूजा करावी. या उपायामुळे आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात.
पितरांचे कार्य पितरांच्या तृप्तीसाठी पिंड दान आणि श्राद्ध विधी अमावस्या तिथीला केले जातात. जर कुंडलीत असेल तर पितृ दोष निवारणासाठीही ही तारीख शुभ मानली जाते. या अमावास्येला दुपारी १२ वाजता पितरांचे कार्य करावे. या दिवशी पितरांच्या मोक्षासाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करून गरजू लोकांना क्षमतेनुसार दान करावे.
शनिदेवाची पूजा करावी अमावस्या आणि शनिवारच्या संयोगामुळे याला शनिश्चरी अमावस्या म्हटले जाते. या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा केल्याने त्रासापासून मुक्ती मिळते. या दिवशी ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा. या दिवशी क्षमतेनुसार कोणत्याही गरजूंना दान करा.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
इतर बातम्या
चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत