रहस्यमयी आहे भारतातील हे मंदिर, डोळ्याला आणि तोंडाला पट्टी बांधून मिळतो प्रवेश

भारतातील लाटू मंदिरात देवाचे थेट दर्शन घेता येत नाही. यामुळेच मंदिराचा पुजारी भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डोळ्यांवर पट्टी बांधतो.

रहस्यमयी आहे भारतातील हे मंदिर, डोळ्याला आणि तोंडाला पट्टी बांधून मिळतो प्रवेश
लाटू मंदिरImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 10:48 AM

मुंबई : भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जी रहस्यांनी भरलेली आहेत. याशिवाय काही मंदिरे हे अनोख्या परंपरेसाठी ओळखली जातात. आज आपण अशाच एका रहस्यमय मंदिराविषयी जाणून घेणार आहोत, जेथे मंदिरात भक्तांना थेट प्रवेश दिला जात नाही. अशी अनोखी परंपरा उत्तराखंडमध्ये असलेल्या लाटू मंदिरात (Mysteries Temple) अनेक वर्षांपासून सुरू आहे. उत्तराखंडच्या लाटू मंदिरात देवाचे थेट दर्शन घेता येत नाही. यामुळेच मंदिराचा पुजारी भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डोळ्यांवर पट्टी बांधतो.

कुठे आहे हे रहस्यमयी मंदिर

हे अनोखे मंदिर उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील देवल ब्लॉकमधील वाना येथे आहे. लाटू मंदिरात लाटू देवतेची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, स्थानिक लोकं लाटू देवता यांना उत्तराखंडच्या नंदा देवीचे धार्मिक भाऊ मानतात आणि त्यांची अपार भक्तीभावाने पूजा करतात.

यामुळे भाविकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते

असे मानले जाते की लाटू मंदिरात नागराज आपले रत्न घेऊन बसले आहेत आणि रत्नाचा तेजस्वी प्रकाश भक्ताला आंधळा करू शकतो. त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पुजारी भाविकांच्या डोळ्यावर पट्टी बांधतात.

हे सुद्धा वाचा

वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला उघडते मंदिर

लाटू मंदिरात वर्षभर प्रवेश मिळत नाही. या मंदिराचे प्रवेशद्वार वैशाख महिन्यातील पौर्णिमेला उघडते. सर्व भक्त दुरूनच देवतेचे दर्शन घेतात. या दरम्यान मंदिराचे पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून मंदिरात प्रवेश दिला जातो.

लाटू मंदिरात अशा प्रकारे केली जाते पूजा

विष्णु सहस्त्रनाम आणि भगवती चंडिका याचे लाटू मंदिरात पाठ केले जातात. मार्शषीश अमावस्येला मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तुम्हालाही या प्रसिद्ध आणि रहस्यमयी मंदिरात जायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला चमोली गाठावे लागेल. दिल्लीहून बसने लाटू देवतेचे दर्शन घेता येणे शक्य आहे, तर ऋषिकेशमार्गे सुमारे 465 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.