Nag Panchami 2021 : नागांची विधीवत पूजा कशी कराल?, मनातून सापांची भीती जाईल, कालसर्प दोषातूनही मुक्ती मिळेल

नाग पंचमी शुक्रवारी म्हणजेच आज 13 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी सापांची पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय, सापांपासून संरक्षण होते. काळसर्प दोषांचा प्रभाव संपतो आणि सापांची भीती मनातून निघून जाते.

Nag Panchami 2021 : नागांची विधीवत पूजा कशी कराल?, मनातून सापांची भीती जाईल, कालसर्प दोषातूनही मुक्ती मिळेल
nag-panchami
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 8:43 AM

मुंबई : सनातन धर्मात साप पूजनीय मानला जातो. महादेव गळ्यात साप धारण करतात, तर जगाचे तारणहार नारायण शेषनागावर विराजमान असतात. पण, साप एक धोकादायक प्राणी आहे, जो लोकांना घाबरवतो. ही भीती लोकांच्या मनातून काढून टाकण्यासाठी आणि पृथ्वीवरील सापांचे महत्त्व सांगून त्यांच्या संरक्षणाचा संदेश देण्यासाठी नाग पंचमीचा सण दरवर्षी साजरा केला जातो. नाग पंचमी श्रावन महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते.

यावेळी नाग पंचमी शुक्रवारी म्हणजेच आज 13 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी सापांची पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय, सापांपासून संरक्षण होते. काळसर्प दोषांचा प्रभाव संपतो आणि सापांची भीती मनातून निघून जाते.

गरुड पुराणात, नाग पंचमीच्या दिवशी, घराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी साप बनवून त्यांची पूजा करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, स्कंद पुराणात नाग पंचमीला नागांची पूजा करताना प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असे सांगितले आहे. नागपंचमीची पूजा पद्धत, उपाय जाणून घ्या.

नाग देवतेची पूजा कशी करावी?

नाग पंचमीच्या दिवशी पाच नाग बनवून त्यांची पूजा केली जाते. हे साप अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक आणि पिंगल यांचे रुप मानले जातात. या दिवशी सकाळी उठल्यावर, स्नान वगैरे केल्यानंतर सर्पदेवतेचे स्मरण करावे. यानंतर, घराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना चांदी, लाकडी किंवा मातीच्या कलमने हळद आणि चंदनाने पाच साप बनवा. नागांना कमळ, पंचामृत, धूप इत्यादी अर्पण करुन त्यांची विधिवत पूजा करा आणि खीर अर्पण करा. यानंतर नाग गायत्री मंत्र आणि सर्पसूक्त पठण करा. मग आरती करा. हे सापांपासून संरक्षण करते आणि सौभाग्य लाभते.

शुभ मुहूर्त काय?

? पंचमी तिथी प्रारंभ – 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 24 मिनिटांपासून सुरु होईल

? पंचमी तिथी समाप्त – 13 ऑगस्ट रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी समाप्त होईल

? नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार साजरा केला जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 49 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.

हे उपाय देखील करुन पाहा

1. या दिवशी नाग देवतेचे दर्शन घ्या आणि त्यांना दुधाने स्नान करा. जर सापाचे दर्शन झाले नाही तर सापाच्या मूर्तीला दूध अर्पण करा.

2. सर्पमित्रांकडून सापाची एक जोडी खरेदी करा आणि जंगलात जाऊन ही जोडी मोकळी करा. सापांच्या भीतीपासून मुक्त होण्याव्यतिरिक्त, यामुळे काल सर्प योगाचे परिणाम कमी होतात.

३. नाग गायत्री मंत्राचा जप करा – “ओम नागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात्”, घरी किंवा मंदिरात बसून किमान 108 वेळा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

नागपंचमीला नागाला दूध का पाजतात? यामागे हे आहे शास्त्र!

भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.