Nag Panchami 2022 : नाग देवतांच्या ‘या’ मंदिरांमध्ये केवळ दर्शनाने काल सर्प दोष होतो दूर; सर्व मनोकामना होतात पूर्ण!
Nag Panchami 2022 : नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नाग देवतेशी संबंधित या पवित्र सणानिमित्त, नाग मंदिरात अनेक भक्त गर्दी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या देशात अशी काही मंदिरे आहेत, जिथे दर्शन केल्याने, भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Nag Panchami 2022 : हिंदू धर्मात (Hindu Religion) नागाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात अनेक जीवांची देवाच्या रूपात पूजा (Worship as God) केली जाते. साप हा देखील असाच एक प्राणी आहे, ज्यावर भारतातील लोकांची गाढ श्रद्धा आहे. नागपंचमीला नागांची विशेष पूजा केली जाते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नागदेवतांची मंदिरेही बांधण्यात आली आहेत. सनातन परंपरेशी संबंधित सर्व पौराणिक कथांमध्ये नागपंचमी महापर्व दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग जातीशी संबंधित प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन त्यांची विधिवत पूजा केल्यास कुंडलीतील कालसर्प दोष (Kalsarpa Dosha) आणि सर्पदंशाची भीती दूर होते. आपल्या देशात अनेक प्रसिद्ध नाग मंदिरे (Famous snake temples) आहेत. जिथे देशभरातून भाविकांची मोठी गर्दी होते. दरम्यान, आपल्या देशात अशीही काही नाग मंदिरे आहेत, जिथे दर्शन केल्याने, भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
तक्षक तीर्थ, प्रयागराज, उत्तर प्रदेश
प्रयागराजच्या संगम शहरात यमुनेच्या तीरावर असलेले तक्षक तीर्थ हे नागपूजेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. केवळ नागपंचमीलाच नाही. तर, प्रत्येक महिन्याच्या पंचमीला या पवित्र मंदिरात पूजा केल्याने जन्मकुंडलीतील कालसर्प दोष आणि सर्पदंशाची भीती दूर होते. तक्षक नागाशी निगडित पवित्र तीर्थावर शिवाची पूजा, रुद्राभिषेक इत्यादींचे खूप महत्त्व आहे.
कर्कोटक नाग मंदिर, नैनिताल, उत्तराखंड
उत्तराखंडमधील नाग देवतेशी संबंधित दोन प्रसिद्ध मंदिरे म्हणजे धौलीनाग आणि कर्कोटक नाग मंदिर. यापैकी धौली नाग मंदिर बागेश्वर जिल्ह्यात तर कर्कोटक नाग मंदिर नैनिताल शहरातील भीमताल येथे आहे. घनदाट जंगलाच्या डोंगरावर वसलेल्या या मंदिराला भीमतालचा मुकुट असेही म्हणतात. नागपंचमीच्या दिवशी कर्कोटक नाग मंदिरात विधिवत पूजा केल्यास कुंडलीतील कालसर्प दोष दूर होतो आणि नागदेवतेच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, असा समज आहे.
नागचंद्रेश्वर मंदिर, उज्जैन, मध्य प्रदेश
महाकालच्या नगरी उज्जैन येथे असलेले नागचंद्रेश्वराचे मंदिर, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या आवारात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी भाविकांच्या दर्शनासाठी खुले होते. असे मानले जाते की, जो व्यक्ती श्रावण शुक्ल पंचमीच्या दिवशी नागचंद्रेश्वर मंदिरात जाऊन पूजा करतो, त्याला आयुष्यात कधीही सर्पदंशाची भीती वाटत नाही आणि नागदेवतेच्या कृपेने त्याच्या जीवनातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात.
मन्नरसला सर्प मंदिर, केरळ
देशातील प्रसिद्ध नाग मंदिरांपैकी एक दक्षिण भारतात आहे. केरळचे मन्नरसला मंदिर सर्प जातीशी संबंधित हजारो मूर्तींसाठी देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. नाग देवतेशी संबंधित या पवित्र मंदिराला नाग मंदिर या नावानेही लोक ओळखतात. हे मंदिर महाभारतकालीन मानले जाते. या नाग मंदिरात नुसते दर्शन आणि पूजा केल्याने लोकांची रिकामी गोद भरून जाते, असे मानले जाते.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)