Nag Panchami 2023 : जीवनात समस्यांचा डोंगर उभा करतो कालसर्प योग, उद्या नागपंचमीला अवश्य करा हे उपाय

Nag Panchami 2023 जेव्हा व्यक्तीच्या पत्रिकेत राहू पहिला आणि केतू शेवटचा ग्रह असतो तेव्हा काल सर्प योग तयार होतो. कालसर्प योगाचा संबंधीत व्यक्तीवर वाईट परिणाम होईल की नाही हे पूर्णपणे एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील ग्रह नक्षत्रांवर अवलंबून असते.

Nag Panchami 2023 : जीवनात समस्यांचा डोंगर उभा करतो कालसर्प योग, उद्या नागपंचमीला अवश्य करा हे उपाय
नागपंचमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 8:34 AM

मुंबई : हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्त्येकाच्याच पत्रिकेत शुभ आणि अशुभ योग भविष्यातील घटनांचे कारण बनतात. पत्रिकेतील ग्रहांची अशुभ स्थिती व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करतात. असाच एक योग म्हणजे कालसर्प योग (Kalsarpa Yoga). जेव्हा व्यक्तीच्या पत्रिकेत राहू पहिला आणि केतू शेवटचा ग्रह असतो तेव्हा काल सर्प योग तयार होतो. याउलट राहू खालच्या स्थितीत बसला असेल तर कालसर्प दोषही निर्माण होतो. कालसर्प योगाचा संबंधीत व्यक्तीवर वाईट परिणाम होईल की नाही हे पूर्णपणे एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील ग्रह नक्षत्रांवर अवलंबून असते. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत हा दोष आढळतो त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी त्यांनी लवकरच काही उपाय योजावेत जेणेकरून हे दोष दूर होतील. नागपंचमीच्या दिवशी हे उपाय केल्यास अधिक फलदायी ठरते. यावेळी नागपंचमी (Nag Panchami 2023) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला म्हणजेच उद्या 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते. कसे ते जाणून घेऊया.

काल सर्प दोषासाठी हा उपाय करा

नाग देवता हे भगवान भोलेनाथांच्या गळ्यात वास करणाऱ्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. नागपंचमी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी नाग देवतेसह महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यात जल अर्पण करावे. त्यानंतर दुधाने अभिषेक करावा. शिवलिंगावर आणि नागदेवतेवर बेलपत्र आणि पांढरे फुल वाहावे. पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.

जोडीची पूजा करा

नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष दूर करण्यासाठी नाग आणि नागीन यांची जोडीने पूजा करावी. यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळतेच शिवाय संपत्ती आणि  धन-धान्यात वाढ होते.

हे सुद्धा वाचा

शुभ मुहूर्तावर करावी पूजा

जर एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर पूजा करावी. सकाळी 5.53 ते 8.30 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावे. तसेच नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ.
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या.
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात.
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?.
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द.
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.