AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narad Jayanti 2022: नारदमुनींनी शिकवली जगाला लोकहिताची पत्रकारिता; वाचा नारदमुनींची पत्रकारिता कशी होती

अनेक मराठी मालिका, सिमेमांमधून महर्षी नारदांची प्रतिमा ही चुकीची रंगविण्यात आली. खरंतर तसं नसून त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक चांगले गुण घेण्यासारखे आहेत.

Narad Jayanti 2022: नारदमुनींनी शिकवली जगाला लोकहिताची पत्रकारिता; वाचा नारदमुनींची पत्रकारिता कशी होती
महर्षी नारद जयंती
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 1:29 PM

17 मे रोजी महर्षी नारद यांची जयंती (Narad Jayanti) आहे. महर्षी नारद (Maharshi Narad) हे आद्य किर्तनकार म्हणून ओळखले जातात. महर्षी नारद यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. महर्षी नारद हे विष्णुभक्त होते. जाणून घेऊया महर्षी नारद यांच्या व्यक्तिमत्वाविषयी.महर्षी नारद हे ब्रह्माच्या 7 मानस पुत्रांपैकी एक आहेत. त्यांना सृष्टीचे पहिले पत्रकार (Journalist) म्हणून ओळखलं जातं. महर्षी नारदांनी जीवनात सूचनांचं जे आदान प्रदान केलं, ते कायम लोकांचं हित लक्षात हित लक्ष घेऊन केलं. आज महर्षी नारद जयंती निमित्त जाणून घेऊ या त्यांना सृष्टीचे पहिले पत्रकार म्हणून का ओळखलं जायचं.

अनेक धार्मिक सिरियल मध्ये महर्षी नारद तुम्हाला हातात वीणा घेऊन. नारायण- नारायण करताना दाखवले गेले. खरंतर शास्त्रानुसार महर्षी नारदांना ब्रह्माच्या 7 मानस पुत्रांपैकी एक मानलं गेलं आहे. त्यांचं चित्रण विष्णुच्या भक्ताच्या रुपात करण्यात आलं. दरवर्षी ज्येष्ठ मास मधील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीला नारद जयंती म्हणून साजरं केलं जातं. यावर्षी नारद जयंती 2022 (Narad Jayanti 2022) मे महिन्यातील 17 तारखेला साजरी केली जाईल. महर्षी नारदांना सृष्टीचे पहिले पत्रकार म्हणून ओळखलं जातं. इथे जाणून घेऊया या गोष्टी मगाची कारणं

महर्षी नारद हे ब्रह्म देवांचे मानसपुत्र, विष्णुंचे भक्त क्षणात इकडे तर क्षणात तिकडे. देव, दानव मानव, पशु पक्षी सर्वांशी मैत्री जपणारे. जगन्मित्र, अजातशत्रु अशी महर्षी नारदांची ओळख. महर्षी नारदांचे व्यक्तिमत्व अगदी साधं, धोतर, उपरणं अशी त्याची राहणी होती. एका हातात वीणा तर दुसऱ्या हातात चिपळ्या, मुखी भगवंताचे अखंड नामस्मरण. डोक्यात सतत भरपूर कल्पना असणारे, कल्पना शक्तीचे अफाट भांडार असलेले. कधी हार न मानणारे, कधी उदास न होणारे. प्रख्यात वकिलासारखे युक्तिवाद करणारे, कधी भांडून तर कधी चर्चा करून. कोणत्याही समस्येवर तोडगा शोधून काढणारे. कायम सर्वांशी संबंध चांगले गोड ठेवणारे असे हे महर्षी नारद होते.

महर्षी नारद हे कोणत्याही लोकात भ्रमंती करायचे तेव्हा तेथील सुख दुखाची सूचना नारायण देवाला देत. त्यामागचा हेतू लोकांचे कल्याण करणं हे होता. एका पत्रकाराचे काम असते जे लोकांमध्ये संवाद निर्माण करणं आणि विचारांचे अदान प्रदान करणं. महर्षी नारद हे काम व्यवस्थित करत आले आहेत. त्यामुळे त्यांना सृष्टीचे पहिले पत्रकार म्हणतात.

विष्णु देवाला जगाचा पालनकर्ता मानलं जातं. नारद खरं तर विष्णु देवाचे खरे दूत होते. महर्षी नारद सृष्टीतील लोकांच्या समस्या नारायणा पर्यंत पोहचवत. जेणे करून लोकांच्या समस्या नारायण दूर करू शकतील. जन कल्याण व्हावं हा त्यामगचा हेतू होता. महर्षी नारदांच्या सूचना नारायणा पर्यंत पोहचविण्याचा हेतू हाच होता की कधी कोणाचं नुकसान होऊ नये. आजच्या काळात महर्षी नारदांची पत्रकारिता शिकणं गरजेचं आहे. महर्षी नारद हे कोणत्याच हेतू ने नाही तर लोकहितासाठी करतात. महर्षी नारदांना अमरतेचे वरदान प्राप्त आहे.

महर्षी नारद हे वेदांचेच ज्ञानी नव्हते तर ते वेदांचा प्रचार, प्रसार पण करत आले आहेत. त्यांना वेदांचे संदेशवाहक म्हणूनही ओळखलं जातं. त्यांना नारायण, शिव आणि इंद्राचे सल्लागार म्हणून ही ओळखलं जायचं. महर्षी नारदांना महाभारताचे रचानाकार महर्षी व्यास आणि रामायणाचे रचानाकार वाल्मीकी यांचे देखील गुरू म्हटलं जातं.

त्यांच्यावर अनेक आरोप झाले. कळीचा नारद. खरंतर त्यांना पाहुनच अनेकांना काहीतरी नवं ऐकायला मिळणार म्हणून आनंद व्हायचा. त्यांना कळलाव्या नारद, काड्या करणारा, भांडण लावून देणारा असे अनेक आरोप झाले. पण, त्यांनी कधीही हे आरोप मनावर घेतलेच नाहीत. बहुजनहित व नीती, धर्माची बाजू घेणं, न्यायासाठी तडजोड करणं हे त्याचं कायम ध्येय होतं. त्यांच्यामुळेच कित्येक दुर्लक्षित संत, महंत, ऋषि, मुनी, शास्त्रज्ञ, विद्ववान, कलावंत, भक्त, जप – तप करणारे असं अज्ञाताच्या पडद्याआड असलेले गुणवंत जगासमोर आले. कोणाच्याही दालनात कधीही त्यांना मुक्त प्रवेश होता. प्रत्येक कीर्तन, भजन, प्रवचनात हे कायम उपस्थीत असंत. कोणत्याही रूपात श्रवणभक्तिसाठी ते असतंच. जिथे भगवंताचे अधिष्ठान असते. जिथे नारायण तिथे महर्षी नारद.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)

'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.