AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narasimha Dwadashi 2021: भक्त प्रल्हादप्रमाणे नरसिंह भगवान तुमचेही कष्ट हरतील, आज सायंकाळी पूजा करा…

फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या द्वादशीला नरसिम्हा द्वादशीच्या नावाने (Narasimha Dwadashi) ओळखलं जातं.

Narasimha Dwadashi 2021: भक्त प्रल्हादप्रमाणे नरसिंह भगवान तुमचेही कष्ट हरतील, आज सायंकाळी पूजा करा...
Narsimha
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:37 PM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार आज आमलकी एकादशी (Amalaki Ekadashi 2021) व्रत आहे. पण, एकादशीची तिथी फक्त सकाळी 9 वाजून 12 मिनिटांपर्यंतची होती. आता द्वादशीची तिथी सुरु झाली आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या द्वादशीला नरसिम्हा द्वादशीच्या नावाने (Narasimha Dwadashi) ओळखलं जातं. भगवान नरसिम्हा यांना नरसिंह भगवानच्या नावानेही पूजलं जातं. कारण, त्यांचं हे रुप अर्ध नर आणि अर्ध सिंहाचं आहे (Narasimha Dwadashi 2021 Know The Significance Of Lord Narsimha Puja Vidhi And Story Of Hiranyakashyap Vadh).

नरसिंह अवतार श्रीहरींच्या 12 स्वरुपांपैकी एक आहे. भगवान विष्णूने आपल्या भक्त प्रहलादचे प्राण त्याच्यात पित्यापासून वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेतला होता आणि ते एका खांबाला छेदून प्रकट झाले होते. जे लोक आज एकादशीचं व्रत ठेवतात ते आज सायंकाळी भगवान नरसिंहाच्या स्वरुपाचीही पूजा करतात करुन त्यांना आपल्या आयुष्याची भक्त प्रल्हादप्रमाणे संकटमुक्त करण्याची प्रार्थना करु शकतात.

ही पूजा कशी करावी?

नरसिंह भगवान श्रीहरी यांचा अवतार आहेत त्यामुळे त्यांची पूजाही त्याचप्रकारे होते. द्वादशीच्या दिवशी सायंकाळी स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर भगवान नरसिंहाच्या फोटोला समोर ठेवून त्यांच्या पुढे अबिर, गुलाल, चंदन, पिवळ्या अक्षता, फळ, पिवळे पुष्प, धूप, दिप, पंचमेवा, नारळ वगैरे अर्पित करा. त्यानंतर नरसिंह देवाच्या कथेचं पठन करा आणि या मंत्राचा जप करा – ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्, सिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् . त्यानंतर देवाकडे घरातील सर्व संकट दूर करण्याची प्रार्थना करा, तसेच काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा मागा.

पूजेचं महत्व

भगवान नरसिंहाची पूजा केल्याने कुटुंबावरील संकटं दूर होतात, घरात आनंद येतो आणि प्रगती होते. मान्यता आहे की हिरण्यकश्यपच्या वधानंतर नरसिंह भगवानने भक्त प्रल्हादला वरदान दिला की जी व्यक्ती या दिवशी श्रद्धा आणि भक्तीने त्यांचं स्मरण करेल, त्यांची पूजा करेल, त्यांच्या जीवनातील शोक, दु:ख, भय आणि रोग दूर होतील. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

व्रत कथा

भक्त प्रल्हादचे पिता हिरण्यकश्यप याने कठीण तपस्या करुन भगवान ब्रह्माजांना प्रसन्न केलं आणि त्यांना एक वरदान मागितला की त्याला ना कोणी मनुष्य मारु शकेल, ना पशु, ना तो दिवसा मारला जावा ना रात्री, ना अस्त्रच्या प्रहाराने, नाही शस्त्रा ने, ना घराच्या आत, नाही घराच्या बाहेर त्याला कोणी मारु शकेल.

हे वरदान मिळाल्याने तो स्वत:ला अमर समजू लागला. लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि तो स्वत: देव मानू लागला. त्याने त्याच्या राज्यात भगवान विष्णूची पूजा करण्यास बंदी घातली. पण त्याचा स्वत:चा पुत्र भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता. त्याने अनेकवेळा सांगितल्यानंतरही भक्त प्रल्हादाने विष्णूची पूजा करणे थांबवलं नाही.

यामुळे हिरण्यकश्यपला क्रोध आला आणि त्याने भक्त प्रल्हादचा छळ करण्यास सुरुवात केली. अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकवेळा भक्त प्रल्हाद बचावला गेला. त्यानंतर त्याने आपली बहीण होलिकासोबत भक्त प्रल्हादला अग्निच्या हवाले केलं कारण होलिकाला अग्निदेवचं वरदान होतं की ती आगीत जळू शकत नाही. पण, विष्णूच्या कृपेने प्रह्लाद वाचला आणि होलिका आगीत भस्म झाली (Narasimha Dwadashi 2021 Know The Significance Of Lord Narsimha Puja Vidhi And Story Of Hiranyakashyap Vadh).

शेवटच्या प्रयत्नात हिरण्यकश्यपने लोखंडाच्या एका खांबाला गरम करुन लाल केलं आणि प्रल्हादला त्याला गळाभेट करण्यास सांगितलं. तेव्हा त्या खांबाला छेदत नरसिंह देवाचं उग्र रुप प्रकट झालं. त्यांनी हिरण्यकश्यपला महालाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटवर, जी ना घराच्या बाहेर होती ना घराच्या आत, गोधूली बेलामध्ये, जेव्हा ना दिवस असतो नाही रात्र, नरसिंह रुपात जो ना मनुष्य होता, ना पशू. नरसिंह देवाने आपल्या नखांनी, जे ना शस्त्र होते, ना अस्त्र, त्याचा वध केला आणि भक्त प्रल्हादला जीवनदान दिलं.

Narasimha Dwadashi 2021 Know The Significance Of Lord Narsimha Puja Vidhi And Story Of Hiranyakashyap Vadh

संबंधित बातम्या :

Amalaki Ekadashi 2021 : अमालकी एकादशी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहुर्त आणि महत्त्व

Rangbhari Ekadashi 2021 : आज ‘रंगभरी एकादशी’, आजच्या दिवशी देवी पार्वती सासरी आल्या होत्या, काशीमध्ये होळी सुरु

Amalaki Ekadashi 2021: एकादशी तिथी आजपासून, पण उपवास उद्या ठेवावा, जाणून घ्या यामागील कारण…

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.