National Calendar | आता एकच सण दोन दिवस साजरा होणार नाही, केंद्र सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल, राष्ट्रीय दिनदर्शिका बनणार!
आपण अनेकदा पाहतो एक सण (Festival)तिथी नुसार आणि तारखेनुसार साजरा केला जातो. पण आतापासून मात्र तसे होणार नाही. 'Zee न्युज' ने दिलेल्या माहितीनुसार एक सण किंवा तारीख यापुढे 2 दिवस साजरी केली जाणार नाही.
मुंबई : आपण अनेकदा पाहतो एक सण (Festival)तिथी नुसार आणि तारखेनुसार साजरा केला जातो. पण आतापासून मात्र तसे होणार नाही. ‘Zee न्युज’ ने दिलेल्या माहितीनुसार एक सण किंवा तारीख यापुढे 2 दिवस साजरी केली जाणार नाही. देशातील सणांची तारीख समान तारखेला करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठे पाऊल उचलले आहे. आता राष्ट्रीय दिनदर्शिका बनवून त्यानुसार सणांच्या तारखा ठरवल्या जाणार आहेत. या पुढे आता राष्ट्रीय दिनदर्शिका तयार करण्यात येणार असून इंग्रजी दिनदर्शिकेऐवजी भारतीय दिनदर्शिकेला मान्यता दिली जाणार आहे. यासाठी देशभरातील 300 विद्वान दोन दिवस उज्जैनमध्ये (Ujjain) सभा भरली जाणार आहे. त्यामुळे उपवास, सण, तिथी आदींबाबत विविध प्रांतातील पंचांगांमुळे निर्माण होणारे मतभेद संपतील.
सणांच्या वेगवेगळ्या तारखांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरकारी सुट्ट्यांच्या तारखाही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भारत सरकारच्या पुढाकाराने आता एकच राष्ट्रीय दिनदर्शिका बनवली जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने भारतीय दिनदर्शिकेला मान्यता देण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे.
विद्वानांचे राष्ट्रीय चर्चासत्र
या अंतर्गत भारताच्या भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेवर विक्रम विद्यापीठात 22-23 एप्रिल रोजी देशभरातील विद्वानांचे राष्ट्रीय चर्चासत्र आणि पंचांगांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभाग, विज्ञान प्रसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टार फिजिक्स, खगोलशास्त्र केंद्र, विज्ञान भारती, धारा, एमपी विज्ञान-तंत्रज्ञान परिषद, विक्रम विद्यापीठ आणि पाणिनी संस्कृत विद्यापीठ या संस्थातील लोक या संस्थेतील मान्यवराचा समावेश असणार आहे. यापूर्वी 1952 मध्ये देशात एकसमान दिनदर्शिकेसाठी दिनदर्शिका सुधारणा समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र नंतर प्रकरण पुढे सरकले नाही. नुकताच केंद्र सरकारने पुन्हा पुढाकार घेतला आहे.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)
संबंधीत बातम्या :
Zodiac | सूर्य बदलणार त्याची रास, या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळणार
Chanakya Niti | आयुष्यात आनंदी राहायचंय? तर या लोकांपासून चार हात लांबच राहा
आज होणार देवीच्या ‘कुष्मांडा’ अवताराचा जागर, जाणून घ्या पूजेची वेळ आणि सर्व काही एका क्लिकवर