Navratri 2021 : नवरात्रीतील नऊ रंगांचे महत्त्व काय आणि यंदा कुठल्या दिवशी कुठला रंग? जाणून घ्या
नवरात्री हा हिंदू समाजासाठी एक शुभ सण आहे आणि तो अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. नवरात्रीचा सण नऊ दिवस साजरा केला जातो ज्यात भक्त दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. मान्सूनोत्तर नवरात्री हिंदू चंद्र महिन्याच्या आश्विन शुक्ल पक्षात साजरी केली जाईल.
मुंबई : नवरात्री हा हिंदू समाजासाठी एक शुभ सण आहे आणि तो अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. नवरात्रीचा सण नऊ दिवस साजरा केला जातो ज्यात भक्त दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. मान्सूनोत्तर नवरात्री हिंदू चंद्र महिन्याच्या आश्विन शुक्ल पक्षात साजरी केली जाईल.
यावर्षी नवरात्री 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाईल. हा उत्सव नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव आहे. सणाच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे रंग असतात जे देवीला समर्पित असतात. या नऊ दिवसांसाठी नऊ रंगांचं खूप महत्त्व असते. जाणून घ्या रंगांची यादी आणि त्याचे महत्त्व जे तुम्ही सणाच्या विशेष दिवसांमध्ये घालायला हवे.
नवरात्री 2021 दिवस 1: पिवळा
प्रतिपदेचा पहिला दिवस गुरुवारी येतो, म्हणून त्या दिवसाचा रंग पिवळा असतो. शारदीय नवरात्रीचा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी, आपण पिवळा रंग परिधान करावा.
नवरात्री 2021 दिवस 2 : हिरवा
नवरात्रीचा दुसरा दिवस द्वितीया आहे. या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. हा दिवस हिरवा रंग घालून साजरा केला जातो जो निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग आहे.
नवरात्री 2021 दिवस 3 : राखाडी
शुभ राखाडी रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला घातला जातो. सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून हा राखाडी देखील एक अद्वितीय रंग आहे.
नवरात्री 2021 दिवस 4 : नारंगी
चौथ्या दिवसाचा रंग नारंगी आहे. हा रंग उन्हाळ्याचे प्रतिनिधित्व करतो आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे घालायचे असतात.
नवरात्री 2021 दिवस 5 : पांढरा
पंचमीच्या पाचव्या दिवशी, सोमवारी सर्वशक्तिमान देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पांढरे रंगाचे कपडे घालावे. पांढरा रंग शुद्धता आणि निरागसपणाचे प्रतीक आहे.
नवरात्री 2021 दिवस 6 : लाल
षष्ठीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्या नवरात्रोत्सवासाठी लाल रंग परिधान करा. लाल रंग हा आरोग्य, जीवन, अनंत धैर्य आणि तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे.
नवरात्री दिवस 7 : रॉयल ब्लू
सप्तमीला निळा रंग परिधान करा, जो बुधवारी येतो. निळा रंग उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणतो.
नवरात्री 2021 दिवस 8 : गुलाबी
भक्तांनी अष्टमीच्या दिवशी गुलाबी रंग परिधान करावा. गुलाबी हे सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे. हा सुसंवाद आणि दयाळूपणाचा रंग आहे.
नवरात्री 2021 दिवस 9 : जांभळा
भाविकांनी नवरात्री 2021 च्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी जांभळा रंग परिधान करावा. हा रंग लाल रंगाची ऊर्जा आणि चैतन्य आणि निळ्या रंगाची रॉयल्टी आणि स्थिरता एकत्र करतो.
PHOTO | Navratri 2021 : नवरात्रीमध्ये देवीच्या उपासनेचे नऊ नियम, जे पूर्ण करतात 9 मोठ्या इच्छाhttps://t.co/uVw58iQAqC
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :