Navratri 2022: नवरात्रीमध्ये खेळल्या जाणाऱ्या गरबा आणि दांडियामध्ये आहे फरक, अनेकांसाठी नवीन आहे ही माहिती

गरबा आणि दांडिया या खेळाला नवरात्रीमध्ये विशेषतः खेळले जातात. मात्र हे दोनीही खेळ एकाच नसून वेगवेगळे आहे.

Navratri 2022:  नवरात्रीमध्ये खेळल्या जाणाऱ्या गरबा आणि दांडियामध्ये आहे फरक, अनेकांसाठी नवीन आहे ही माहिती
बायकोसोबत गरबा नाचताना अचानक खाली कोसळलाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 8:23 PM

मुंबई, सध्या देशभरात नवरात्रोत्सव (Navratri 2022) धुमधडाक्यात साजरा होत आहे. अनेक ठिकाणी दुर्गापूजेचे (Durga puja) आयोजन केले जाते. नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया (Garba And Dandiya) खेळण्याची प्रथा आहे. अनेक ठिकाणी याचे आयोजन केले जाते, गरबा आणि दांडियाच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण असलेल्या गरबा-दांडिया या खेळांमध्ये अंतर आहे. हे दोनीही वेगवेगळे खेळ आहेत. या दोनीही खेळांचे  विशेष अर्थ देखील आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

गरबा आणि दांडियाचे महत्त्व

नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याचे महत्त्व मोठे आहे. विशेषतः गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा प्राचीन आहे. नवरात्रीच्या उत्सवात दुर्गा मातेच्या मूर्तीसमोर किंवा अखंड ज्योतीसमोर गरबा आणि दांडिया खेळला जातो.

गरबा आणि दांडियाचा अर्थ

गरबा आणि दांडिया या दोन्हींचे अर्थ एकमेकांपेक्षा बराच वेगळा आहे. गरबा हा शब्द गर्भातील बाळाच्या जीवनापासून बनला आहे. गरबा दरम्यान, लोकं एक वर्तुळ बनवून नृत्य करतात आणि जीवनचक्राचे चित्रण करतात. दुसरीकडे, दांडिया नृत्य हे माता दुर्गा आणि महिषासुर यांच्यातील युद्धाचे प्रतीक आहे. त्यामुळे लोकं दांडियामध्ये तलवारींऐवजी रंगीत काठ्या घेऊन नाचतात.

हे सुद्धा वाचा

दांडिया खेळण्याचे कारण

धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत दांडिया खेळणे खूप शुभ आहे. त्यामुळे नऊ दिवस दररोज सायंकाळी मातेची पूजा केल्यानंतर तेथे उपस्थित भाविक दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर दांडिया खेळतात. गुजरातच्या प्रत्येक गल्लीत विशेषतः नवरात्रीच्या काळात दांडियाचा आवाज ऐकू येतो. गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्रात देखील गरबा आणि दांडियाच्या खेळाला पसंती मिळत आहे. या खेळाच्या निमित्याने नवीन ओळखी होतात सण साजरा केल्याचा आनंद मिळतो. (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.