Navratri 2024 : उद्या आहे नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती ? जाणून घ्या सर्वकाही

Navratri Pujan: नवरात्रीचे पर्व उद्या,3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मात्र माहितीअभावी काही लोक बरेच वेळा घटस्थापनेच्या वेळी चूक करतात. ज्याचा प्रभाव नंतर दिसू शकतो. त्यामुळेच शुभ वेळ लक्षात घेऊन त्या वेळेतेच घटस्थापना करा आणि योग्य पद्धतीचा अवलंब करा. घटस्थापनेची पद्धत आणि वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

Navratri 2024 : उद्या आहे नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती  ? जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 1:19 PM

हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण शारदीय नवरात्रीला उद्यापासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण 9 दिवस दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. नवरात्रीत 9 दिवस अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण 9 दिवस उपासही करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची शुभ वेळ कोणती, मुहूर्त कधी पर्यंत आहे, योग्य पद्धत काय, हे सर्व जाणून घेऊया.

पंचांगानुसार, या वर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 02 वाजून 58 मिनिटांपर्यंत वैध असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार या वर्षी शारदीय नवरात्रीला गुरुवार, 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. घटस्थापनेसाठी पहिली शुभ वेळ सकाळी 6 वाजून 15 मिनिटं ते 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. तुम्हाला घटस्थापना साठी 1 तास 6 मिनिटे वेळ मिळेल.

घटस्थापनेचा दुसरा मुहूर्तही दुपारी आहे. हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो. तुम्ही दिवसभरात सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत दरम्यान कधीही घटस्थापना करू शकता. तुम्हाला दुपारी 47 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल.

घटस्थापना कशी करावी

कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावे, त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत. कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा. या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर आंब्याची किंवा अशोकाची पाने 5 ठेवावीत, त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा, पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा.

नवरात्रीत रोज पूजा कशी करावी ?

नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी. दोन्ही वेळा मंत्राचा जप करा आणि आरती देखील करा. नवरात्रीच्या काळात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवता येईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.