Masik Shivratri 2022: नवीन वर्षाची सुरुवात मासिक शिवरात्रीने , जाणून घ्या पूजा , शुभ मुहूर्त आणि सर्वकाही

मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करतात अशी मान्यता आहे. या दिवशी जे लोक मनोभावाने देवाची पुजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात मासिक शिवरात्रीचे या दिवसाचे महत्त्व

Masik Shivratri 2022: नवीन वर्षाची सुरुवात मासिक शिवरात्रीने , जाणून घ्या पूजा , शुभ मुहूर्त आणि सर्वकाही
lord-shiva
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 2:08 PM

मुंबई : आज इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या दिमाखात झालेली पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वांच्या मनात सकारात्मक ऊर्जा असते. वाईट सवयी आणि प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकामध्ये आशा जागृत होते. यावेळी नवीन वर्षाची सुरुवात पवित्र अशा मासिक शिवरात्रीने झाली आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वर्षाचा पहिला दिवस खूप शुभ आहे. मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करतात अशी मान्यता आहे. या दिवशी जे लोक मनोभावाने देवाची पुजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात मासिक शिवरात्रीचे या दिवसाचे महत्त्व.

पूजेची वेळ

हिंदू कॅलेंडरनुसार, चतुर्दशी तिथी 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.17 वाजता सुरू होईल. 2 जानेवारी 2022 रोजी चतुर्दशीची तिथी रविवारी पहाटे 3:41 वाजता संपेल. शिवरात्रीच्या महिन्यात रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, अशा स्थितीत पूजेचा शुभ मुहूर्त शनिवार, 1 जानेवारी रोजी रात्री 11.58 वाजता सुरू होईल आणि शनिवारी रात्री 12.52 पर्यंत चालेल.

शिवरात्रीच्या पूजेचे फळ

शिवरात्रीच्या पवित्र सणाला भगवान शिव शंकरांची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शिव उपासना ही ती साधना आहे, ज्याद्वारे साधना करणाऱ्या व्यक्तीला योग्य वधू किंवा वर, योग्य मुले, संपत्ती, कीर्ती इत्यादी मिळतात तसेच जीवनाशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शिवरात्रीला काल महाकाल रुद्रची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते.

परिश्रम करुन ही फळ मिळत नाही मग हे उपाय करा

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, परंतु तरीही तुम्हाला योग्य फळ मिळत नाही, तर या दिवशी पाण्यात जव आणि काळे तीळ टाकून शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. त्यानंतर त्याच्या वजनाएवढा चारा खरेदी केल्यानंतर तो बैलाला किंवा गायीला द्यावा. वर्षाच्या पहिल्या दिवशी हे काम केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. अशी मान्याता आहे. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरी आणून त्याची विधिवत स्थापना करावी. त्यानंतर दररोज या शिवलिंगाची नियमित पूजा करावी.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac | 2022 मध्ये या 4 राशींच्या व्यक्तींचे करिअर गरुडझेप घेणार! चांगल्या संधी दार ठोठवणार

Horoscope Today 1 January 2022 | काय होणार या वर्षात ? कसा असेल वर्ष 2022 चा पहिला दिवस? , जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Zodiac | 2022 मध्ये या 3 राशींच्या व्यक्तींना अफाट यश, भरपूर पैसा मिळणार, तुमची रास यामध्ये आहे का?

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.