Sankashti Chaturthi 2021 | नवीन वर्षातील पहिली चतुर्थी, जाणून घ्या पूजेचा विधी आणि चंद्रोदयाची वेळ
चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंदाचं फूल अर्पण करुन पूजा-अर्चना केली जाते. तसेच, यादिवशी गणेश स्त्रोत्राचे पठण केले जाते.
मुंबई : नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आज (2 जानेवारी) आहे (First Sankashti Chaturthi Of 2021). जानेवारी महिन्यात दोन संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे. पहिली संकष्टी चतुर्थी 2 जानेवारी तर दुसरी चतुर्थी 31 जानेवारीला आहे. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंदाचं फुल अर्पण करुन पूजा-अर्चना केली जाते. तसेच, यादिवशी गणेश स्त्रोत्राचे पठण केले जाते. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी धन, आरोग्य, सौख्य यांच्या कृपावृष्टीसाठी हा उपवास केला जातो (First Sankashti Chaturthi Of 2021).
दर महिन्यात संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थी अशा दोन चतुर्थी येतात. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्हच्या वेळी म्हणजेच दुपारी 12 वाजता सोडला जातो. पण संकष्टी ही चंद्रोदयानंतर सोडली जाते. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व आहे. चंद्राला अर्घ्य देऊन बाप्पाची आरती करुन उपवास सोडला जातो. यावेळी बाप्पाला मोदकांचं नैवेद्यही दाखवलं जातं.
नव्या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला कशा पद्धतीने पूजा करावी –
सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला. त्यानंतर गणेशाची पूजा करा. त्यासाठी गणेशाच्या प्रतिमेला उत्तर-पूर्वेकडील दिशेला स्थापन करा. त्यानंतर बाप्पाला जल, अक्षता, दुर्वा, चंदन, तीळ, गूळ, लाडू, सुपारी, धूप अर्पण करा आणि गणेशाला वंदन करा.
त्यानंतर केळीच्या पानावर किंवा ताटात रांगोळीने त्रिकोण काढा. त्यावर तुपाचा दिवा लावा. मधे मसूरची डाळ आणि सात लाल मिर्च्या ठेवा. त्यानंतर ‘अग्ने सखस्य बोधि नः’ या मंत्राचा 108 वेळा जाप करा. त्यानंतर व्रत कथा वाचा आणि बाप्पाची आरती करा.
चंद्रोदयानंतर उपवास सोडावा
दिवसभर उपवास ठेवल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणपतीची पूजा करा. रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर उपवास सोडा.
संकष्टी चतुर्थी केल्याने कर्जातून मुक्ती मिळते
संकष्टीच्या दिवशी जे भक्त श्रद्धा आणि भक्तीसह बाप्पाची आराधना करतात, उपवास ठेवतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कुटुंबातील सर्व समस्यांचा नाश होतो. कर्जातून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे (First Sankashti Chaturthi Of 2021)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ काय?
मुंबई – रात्री 9.16
पुणे – रात्री 9.12
नागपूर – रात्री 8.46
नाशिक – रात्री 9.10
रत्नागिरी- रात्री 9.17
Vinayaka Chaturthi 2020: विनायक चतुर्थीला अशी करा लाडक्या बाप्पाची पूजा, जाणून घ्या विधी आणि मुहूर्तhttps://t.co/Q1GhunfvRQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 18, 2020
First Sankashti Chaturthi Of 2021
संबंधित बातम्या :