Nirjala Ekadashi 2022: …म्हणून निर्जला एकादशीला असते इतके महत्व: मुहूर्त आणि नियम
जर तुम्ही वर्षभरात 24 एकादशींचे व्रत करू शकत नसाल तर केवळ निर्जला एकादशीचे व्रत केल्याने सर्व एकादशींचे लाभ मिळतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. यावर्षी निर्जला एकादशी शुक्रवार, 10 जून 2022 रोजी साजरी केली जाणार आहे.
वर्षभरात येणाऱ्या सर्व 24 एकादशींपैकी निर्जला एकादशीला (Nirjala Ekadashi 2022) विशेष महत्त्व आहे. निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये पाणीसुद्धा पिता येत नाही, म्हणूनच निर्जला एकादशीचे व्रत सर्वात कठीण मानले जाते. जर तुम्ही वर्षभरात 24 एकादशींचे व्रत करू शकत नसाल तर केवळ निर्जला एकादशीचे व्रत केल्याने सर्व एकादशींचे लाभ मिळतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. यावर्षी निर्जला एकादशी शुक्रवार, 10 जून 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी तीळ आणि पाण्याने भरलेला कलश दान केल्याने भाविकांना वर्षभरातील सर्व एकादशींचे लाभ मिळतात, अशी मान्यता आहे. या व्रताचे काही नियम आहेत. त्यानुसार हे व्रत केल्यास इच्छित फळ मिळते. जाणून घेऊया त्याबद्दल माहिती.
निर्जला एकादशी शुभ मुहूर्त
शुक्रवार, १० जून २०२२ रोजी निर्जला एकादशीचा मुहूर्त (Nirjala ekadashi 2022 Muhurta) सुरू होते- 10 जून 2022 सकाळी 07:25 वाजता एकादशी मुहूर्त संपेल – 11 जून 2022 रोजी सकाळी 05:45 वाजता निर्जला एकादशी पारणाची वेळ – सकाळी 05.49 ते 08.29
निर्जला एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे दान करा
– कडधान्य – पाणी – कपडे – आसन – चपला – छत्री – फळे इत्यादी
व्रत कसे करावे?
- एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
- यानंतर भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र परिधान करावे.
- भगवान विष्णूंना पिवळी फुले, पंचामृत अर्पण करा.
- पाण्याचा एकही घोटही न पिता उपवास करायचा आहे.
- जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही फळे किंवा उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता.
- या दिवशी श्री हरी आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा.
- या दिवशी गरजूंना दान केल्यावरच उपवास सोडावा.
निर्जला एकादशीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका
- एकादशी तिथीच्या सूर्योदयानंतर द्वादशी तिथीचा सूर्योदय होईपर्यंत पाणी प्यायले जात नाही आणि काहीही खाल्ले जात नाही.
- एकादशीला घरी भात शिजवू नये.
- या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत.
- निर्जला एकादशीच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे वर्ज्य मानले जाते.
- कांदा, लसूण किंवा मांस-मद्य सेवन करू नये.
- अनावश्यक आळस करू नये.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)