Numerology Today 6, December 2021 | आता अंकशास्त्रानुसार तुमचे करिअर ठरवा, पाहा तुमचा शुभ अंक काय सांगतोय ?

आज काल सर्वच जण कोणत्या ना कोणत्या चिंतेत असतात. कोणाला लग्न जमत नाही म्हणून टेन्शन तर कोणाला नोकरी मिळत नाही म्हणून. पण या सर्वामध्ये करिअरचे टेन्शन हे मोठ्या प्रमाणात आढळून येते.

Numerology Today 6, December 2021 | आता अंकशास्त्रानुसार तुमचे करिअर ठरवा, पाहा तुमचा शुभ अंक काय सांगतोय ?
numerology
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 9:05 AM

मुंबई : आज काल सर्वच जण कोणत्या ना कोणत्या चिंतेत असतात. कोणाला लग्न जमत नाही म्हणून टेन्शन तर कोणाला नोकरी मिळत नाही म्हणून. पण या सर्वामध्ये करिअरचे टेन्शन हे मोठ्या प्रमाणात आढळून येते. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सांगाण्यावर आपण करिअरची सुरुवात करतो पण पुढे जावून त्या क्षेत्रामध्ये रस राहत नाही. असे आपल्यापैकी अनेक लोकांसोबत होते. पण अंकशास्त्रात तुम्ही कोणते क्षेत्र निवडावे या बाबत माहिती देण्यात आली आहे. तुमच्या शुभ अंकाप्रमाणे तुम्ही तुमचे क्षेत्र निवडू शकता. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही कोणते क्षेत्र निवडाल.

शुभअंक 1 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे त्यांचा शुभ अंक 1 असतो. या व्यक्तींनी शस्त्रक्रिया, राजदूत, विज्ञान, किंवा जहाजांशी संबंधित भाग रत्नांचे कार्य, लेखन या क्षेत्रामध्ये काम करावे. असे लोक प्रशासकीय सेवा, व्यवसाय, मनोरंजन संबंधित क्षेत्रात उत्तम काम करतात.

शुभअंक 2 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झाला आहे त्यांचा शुभ अंक 2 असतो. या व्यक्ती हॉटेल, प्रवासासंबंधी व्यवसाय , पत्रकारिता, गाणी-संगीत, नृत्य, कविता, दुग्धव्यवसाय, शेती आणि पशुसंवर्धन इत्यादींशी संबंधित कामांमध्ये यश मिळते.

शुभअंक 3 साठी करिअर आणि व्यवसाय अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला त्यांचा शुभ अंक 3 असतो. या व्यक्तींसाठी शिक्षण, सेवा, न्यायालयीन काम, राजदूत, पोलिस, तत्त्वज्ञान, विज्ञान, बँक आणि जाहिरात इ. यासोबतच औषधे आणि उपकरणे यांच्याशी संबंधित काम यश प्राप्त करुन देतात.

शुभअंक 4 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झाला असेल त्यांचा शुभ अंक 4 असतो. हे लोक अभियंता, सेल्समन, वकिली, रेल्वे, टेलिग्राफी, पत्रकारिता, लेखन, संपादन, वाहतूक, राजकारणाशी संबंधित कामे करू शकतात. याशिवाय ज्योतिषशास्त्राशी संबंधित कार्य, पुरातत्वाशी संबंधित कार्य देखील हे लोक करु शकतात.

शुभअंक 5 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला असेल असेल त्यांचा शुभ अंक 5 असतो. अंकशास्त्रानुसार हे लोक अभियंता, सेल्समन, रोख व हिशोबाचे काम, वकिली, रेल्वे, तार, पत्रकारिता, वाहतूक, संबंधित कामे करू शकतात.

शुभअंक 6 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झाला असेल असेल त्यांचा शुभ अंक 6 असतो. हे लोक स्थापत्य, अभियांत्रिकी, रत्ने, दागिने, परकीय चलन, कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य किंवा संबंधित, हॉटेल, कादंबरी, कथालेखन, खाद्यपदार्थ, पुस्तक प्रकाशन, संगीत, चित्रकला, नृत्य आणि इतर कला या क्षेत्रात यश मिळते .

शुभअंक 7 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झाला असेल त्यांचा शुभ अंक 7 असतो. अंकशास्त्रानुसार, चित्रपट व्यवसायाशी संबंधित काम, प्रवास, विमान प्रवासाशी संबंधित काम, दुग्धव्यवसाय, वाहन चालवणे, हेरगिरी कुस्ती आणि यासोबतच लेखन, संपादन आणि पत्रकारितेशी संबंधित काम आणि राजकारणाशी संबंधित कामही त्यांच्यासाठी खूप शुभ आहे.

शुभअंक 8 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झाला असेल त्यांचा शुभ अंक 8 असतो. अंकशास्त्रानुसार अभियंता, खेळाडू, नगरपालिका, उच्च अधिकारी या क्षेत्रात काम करु शकतो. त्याच प्रमाणे कंत्राटी, वकिली, बागकाम, कोळसा, खाण, पोल्ट्री या क्षेत्रातही काम करु शकतात.

शुभअंक 9 साठी करिअर आणि व्यवसाय ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झाला असेल त्यांचा शुभ अंक 9 असतो. अंकशास्त्रानुसार सैन्य, पोलीस, रसायनशास्त्र आणि यंत्रसामग्री या क्षेत्रात काम करु शकतात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

06 December 2021 Panchang : कसा असेल सोमवारचा दिवस? पाहा काय सांगतय पंचांग

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.