बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी खीर, रव्याचा गोड शिरा आणि बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य
Buddha Purnima 2022: बुद्ध पौर्णिमा हिंदू कॅलेंडर नुसार सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे. यादिवशी बुद्धां व्यतिरिक्त विष्णु आणि चंद्र देवाची पुजा केली जाते. याखास दिवसांसाठी
आज 16 मे देशभरात बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2022) मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा देखील म्हटलं जातं. यादिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता असं मानतात. त्यामुळे या दिवसाल गौतम बुद्धांचा (Gautam Buddha) जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून यादिवशी बुद्ध जयंती साजरी केली जाते. यादिवशी बुद्ध, विष्णु आणि चंद्रदेवाची पुजा विधीवत केली जाते. यादिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्व आहे. अनेक लोक यादिवशी गोड नैवेद्य अर्पण करण्यासाठी खास पदार्थ बनवतात (Buddha Purnima Recipes) चला तर जाणून घेऊया आजच्या दिवशी तुम्ही कोणते खास पदार्थ बनवू शकता.
पंचामृत
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पंचामृत बनवणं खूप शुभ मानलं जातं. ते बनविण्यासाठी तुम्हाला एक वाटी दूध, एक चमचा तूप, एक चमचा साखर, एक वाटी दही आणि एक चमचा मध लागणार आहे. ही सर्व साहित्य एकत्र करा. त्यात तुम्ही केळ्याचे तुकडे आणि वेलची पावडर मिसळू शकता. पंचामृताचा भोग देवाला दाखवा. घरातील सदस्यांना नैवेद्या द्या.
रव्याचा शिरा
रव्याचा शिरा जवळजवळ प्रत्येक सणाला केला जातो. तुम्ही रव्याचा शिरा बुद्ध पौर्णिमेच्या खास दिवशी ही बनवू शकता. हा बनवणं खूपच सोप्पं आहे. गोडाचा शिरा लहान मुलांना जास्त आवडतो. रव्याचा शिरा तूप, साखर, रवा आणि सुखा मेवा वापरून केला जातो. यात तुम्ही ओल्या किस्लेल्या ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता. हा शिऱ्याची चव अधिकच वाढवतो.
बुंदीचे लाडू
तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देवाला बुंदीच्या लाडूचा प्रसाद दाखवू शकता. हे लाडू बेसन, साखर, तुप आणि केसर तसंत काजू, मणुके यांच्या वापराने केला जातो. बुंदीचे लाडू खूपच चविष्ट होतात.
साबुदाण्याची खीर
साबुदाण्याची खीर तयार करण्यासाठी साबूदाना, पाणी, दूध, साखर आणि सुखा मेवा आणि वेलची पावडरचा वापर केला जातो. खीर तयार करण्यासाठी साबूदाना पाण्यात भिजवला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवाला या खीरीचा नैवेद्य दाखवा. नंतर खीर घरात सर्वांना खायला द्या.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)