भारतातील एक असे मंदिर जेथे देवाला अर्पण केले जाते घड्याळ, होतात सर्व मनोकामना पूर्ण
स्थानिक लोकांच्या मते, एकदा एक व्यक्ती चांगला ड्रायव्हर बनण्याच्या इच्छेने ब्रह्माबाबा मंदिरात आला होता. बाबांच्या मंदिरात केलेली त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि तो चांगला ड्रायव्हर झाला. आनंदी होऊन त्या व्यक्तीने या मंदिरात घड्याळ अर्पण केले होते. या मंदिरात मनोकामना पूर्ण होतात हे समजल्यावर लोकांनी मंदिरात दान म्हणून घड्याळ द्यायला सुरुवात केली.
मुंबई : मंदिरात जाण्यापूर्वी लोकं देवाला अर्पण करण्यासाठी फळे, फुले, हार, मिठाई इत्यादी वस्तू खरेदी करतात. मनोकामना किंवा नवस पूर्ण झाल्यानंतर लोकं मंदिरांमध्ये देवाला कबुल केल्याप्रमाणे भेटवस्तू किंवा विशिष्ट नैवेद्य दाखवतात. सर्वसाधारण पणे मंदिरीत अशीच पद्धत आहे, पण आम्ही तुम्हाला अशा मंदिराविषयी सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण भारतात असे एक मंदिर (Ghadiwale baba temple in India) आहे जिथे लाडू किंवा इतर नैवेद्य नाही तर चक्क घड्याळं अर्पण केले जातात. येथे जाऊन घड्याळ अर्पण केल्यास कोणत्याही प्रकारचा अपघात आणि वाईट वेळ टळू शकते, अशी मान्यता आहे. याविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊया.
इच्छा पूर्ण झाल्यावर अर्पण केले जाते घड्याळ
हे मंदिर उत्तर प्रदेशातील जौनपूर जवळील एका गावात आहे. हे मंदिर ब्रह्माबाबा म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे येणारा प्रत्येक भाविक फुलांच्या हारांऐवजी मंदिरात घड्याळं अर्पण करतो. या मंदिराची ही परंपरा सुमारे 30 वर्षे जुनी आहे. या अनोख्या प्रसादामुळे हे मंदिर लोकांमध्ये चर्चेचे केंद्र राहिले आहे. ब्रह्माबाबा किंवा घडीवाले बाबांच्या या अनोख्या मंदिरामागे एक परंपरा आहे.
अशा प्रकारे सुरू झाली घड्याळ अर्पण परंपरा
स्थानिक लोकांच्या मते, एकदा एक व्यक्ती चांगला ड्रायव्हर बनण्याच्या इच्छेने ब्रह्माबाबा मंदिरात आला होता. बाबांच्या मंदिरात केलेली त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि तो चांगला ड्रायव्हर झाला. आनंदी होऊन त्या व्यक्तीने या मंदिरात घड्याळ अर्पण केले होते. या मंदिरात मनोकामना पूर्ण होतात हे समजल्यावर लोकांनी मंदिरात दान म्हणून घड्याळ द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत हे परंपरेप्रमाणे चालत आले आहे.
दूरदूरवरून लोक घड्याळं देण्यासाठी येतात
घडीवाले बाबांचे हे मंदिर इतके लोकप्रिय आहे की त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर लोक दूरदूरवरून येथे नैवेद्य दाखवण्यासाठी येतात. या मंदिराच्या बाहेर एक वटवृक्ष आहे जिथे लोक घड्याळ लटकवतात. या मंदिराची आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरात प्रसाद म्हणून दिलेली घड्याळे कोणीही चोरत नाही. या मंदिरात वर्षभर भाविक येत असतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)