Pandharpur wari 2022: फलटण येथील मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरडच्या दिशेने मार्गस्थ

सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे (Pandharpur Wari 2022) 28 तारखेला आगमन झाले.  फलटण येथे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी (Dnyaneshwar Maharaj palkhi) आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बरडच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्याआधी आज पहाटे फलटण विमानतळ मैदानावर माऊलींची धुपारती पार पडली. यासाठी फलटणचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर (Ranjeet Naik Nimbalkar) हे उपस्थित होते फलटण पासून […]

Pandharpur wari 2022: फलटण येथील मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरडच्या दिशेने मार्गस्थ
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 9:21 AM

सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे (Pandharpur Wari 2022) 28 तारखेला आगमन झाले.  फलटण येथे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी (Dnyaneshwar Maharaj palkhi) आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बरडच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्याआधी आज पहाटे फलटण विमानतळ मैदानावर माऊलींची धुपारती पार पडली. यासाठी फलटणचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर (Ranjeet Naik Nimbalkar) हे उपस्थित होते फलटण पासून बरड पर्यंतचे सुमारे 20 किलोमीटरचे अंतर आहे. हा टप्पा आज दिवसभरात पूर्ण केला जाणार असून आजचा माऊलींचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असणार आहे उद्या माऊलीची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

इंदापूरात पार पडले तुकोबारायांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण

मजल दर मजल करीत वैष्णवांची वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.  विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढऱ्याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले (Indapur Frist ringan sohala). उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज इंदापूर शहरातील सौ कस्तुरा बाई श्रीपती कदम या विद्यालयात आश्र्वाचे गोल रिंगण पार पडले,  रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊन पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी  पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या  सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळशीवाल्या महिला पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगणाभोवती उभ्या होत्या.

पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा निमगाव केतकी येथील मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाला सकाळी 11,30 वाजता रिंगण सुरू झाले. पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला.  सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर विठू नामाचा गजर करीत वारकरी  खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला वारकरी  धावल्या नंतर विणेकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला. मानाचे अश्व धावण्यास सुरुवात झाली, एका पाठोपाठ एक असे अश्व धावले. अश्वधावण्याच्या अगोदर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या आश्वांची पूजा केली होती.

हे सुद्धा वाचा
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.