Pandharpur wari 2022: आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचा विस्फोट; एकाचा मृत्यू

पंढरपूर, (Pandharpur) यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्याने लाखोंच्या संख्येने वारकरी वारीत सामील झाले आहेत. कोरोनाचा धोका (corona positive) अद्याप कमी झालेला नसून एक आषाढीच्या (aashadhi wari 2022) तोंडावर कोरोनाचे सावट भक्तांवर घोंगावत आहे. पंढरपुरात तब्बल 39 कोरोनाबाधित सापडले असून एकाच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिक […]

Pandharpur wari 2022: आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचा विस्फोट; एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 3:15 PM

पंढरपूर, (Pandharpur) यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्याने लाखोंच्या संख्येने वारकरी वारीत सामील झाले आहेत. कोरोनाचा धोका (corona positive) अद्याप कमी झालेला नसून एक आषाढीच्या (aashadhi wari 2022) तोंडावर कोरोनाचे सावट भक्तांवर घोंगावत आहे. पंढरपुरात तब्बल 39 कोरोनाबाधित सापडले असून एकाच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. आषाढीच्या तोंडावर कोरोना पाय पसरत असल्याने वारी काळात एक हजार रूग्ण क्षमतेचे विलगीकरण कक्षाची उभारणी केली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून वारी काळात मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यंदा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंर वारी होत असल्याने मोठ्या उत्साहात वारकरी सहभागी झाले आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पंढरपूरमध्ये (Pnadharpur wari 2022) एकादशीचा मोहत्त्सव साजरा होत आहे. यंदाच्या वारीत विक्रमी वारकरी सामील झाल्याने भाविकांची गैरससोय टाळण्यासाठी  24 तास दर्शन (24 hours dharshan) व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. 1 तारखेपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. चोवीस तास दर्शनाला उभे राहून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे.  इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारतीपर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते.त्यानंतर मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळं दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्यासाठी दर्शन बंद राहणार असून, उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र  दर्शन घेता येणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.