Pandharpur Wari 2022: संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान

परळी, राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे (Gajanan Maharaj Plakhi 2022) शुक्रवारी परळीत आगमन झाले. कालचा मुक्काम झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे अंबाजोगाईकडे (Ambejogai) प्रस्थान झाले आहे. या पालखीचे परळीच्या (Parali) भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या दिंडीचे यंदा 53 वे वर्ष आहे. यात सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते, […]

Pandharpur Wari 2022: संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 12:51 PM

परळी, राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे (Gajanan Maharaj Plakhi 2022) शुक्रवारी परळीत आगमन झाले. कालचा मुक्काम झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे अंबाजोगाईकडे (Ambejogai) प्रस्थान झाले आहे. या पालखीचे परळीच्या (Parali) भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या दिंडीचे यंदा 53 वे वर्ष आहे. यात सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते, संत ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषा बरोबरच टाळ-मृदुंगाने परिसर दुमदुमला आहे. हातात भगवा पताका, पांढरे शुभ्र वस्त्र आणि मुखात विठुरायाचे नामस्मरण करीत अतिशय शिस्तीत ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या वारीमध्ये विशेष महत्त्व असते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पालखी सोहळ्यात खंड पडला होता. त्यामुळे यंदाच्या वारीत वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटरचे अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. यावर्षी संत गजानन महाराजांच्या दिंडीचं हे 53 वर्ष आहे. गेल्यावर्षी  शेगाव संस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव निळकंठ दादा पाटील यांनी विधिवत पूजा आरती करून 6 जूनला  पालखीला प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यानंतर मोठ्या दिमाखात गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.