Pandharpur Wari 2022: विठ्ठल रुक्मिणीला एक कोटी रुपयाचा सोन्याचा मुकुट!
Pnahdarpur Wari 2022: तब्ब्ल दोन वर्षांनी कोरोनाचे संकट दूर झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले भक्त बऱ्याच वर्षांनी भक्तांना विठ्ठलावरचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळालीये. नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा मुकुट भेट दिलाय.
Pandharpur Wari 2022: दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. पंढरपूर, आषाढी एकादशी (aashadhi Ekadashi 2022) निमित्त पंढरपुरात (Pandharpur wari 2022) वैष्णवांचा महासागर जमलेला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तब्ब्ल दोन वर्षांनी कोरोनाचे संकट दूर झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले भक्त बऱ्याच वर्षांनी भक्तांना विठ्ठलावरचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळालीये. नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा मुकुट भेट दिलाय.
एक कोटी रुपयाचे सोन्याचे मुकुट भेट देणार
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयाचे सोन्याचे मुकुट भेट म्हणून देण्यात आलंय. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला सोन्याचे मुकुट भेट देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम पार पडेल. विजयकुमार उत्तरवार उमरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. आर्य वैश्य कोमटि समाजाच्या वतीने उत्तरवार यांचा केला जाणार सत्कार .
यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा पार पडणार
यंदा 10 जुलैला पार पडणार्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू मधून संत तुकाराम महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. आषाढी एकादशीची महापूजा संपन्न करण्याचा मान यंदा चार पुजारी मंडळींना मिळाला आहे. या पूजेचं एक वेगळेपण असते. आषाढी एकादशीची महापूजा ही महत्त्वाची असते. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही पूजा करतात. यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे. याशिवाय वारीमध्ये आलेल्या एका जोडप्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, कृष्णा नामदास ,सुनील गुरव, आष्टेकर हे पुजारी ही एकादशीची महापूजा संपन्न करतील. मंदिर व्यवस्थापनाकडून महापूजेची तयारी पूर्ण झाली आहे.