Papankusha Ekadashi 2023 : पापांमधून मुक्त होण्यासाठी आज करा पापांकुशा एकादशी व्रत, असे आहेत नियम

या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने जीवनात समृद्धी येते. तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होतात, घरामध्ये धनवृद्धी होते, वैवाहिक जीवन सुखी होते, सर्व कामात यश प्राप्त होते, मुलांची प्रगती सुनिश्चित होते आणि व्यवसाय वाढतो.

Papankusha Ekadashi 2023 : पापांमधून मुक्त होण्यासाठी आज करा पापांकुशा एकादशी व्रत, असे आहेत नियम
एकादशीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 10:32 AM

मुंबई : आज पापंकुशा एकादशी (Papankusha Ekadashi 2023) आहे. प्रत्येक एकादशी स्वतःच खूप महत्वाची असते. आश्विन शुक्ल पक्षातील ही एकादशी सर्वांसाठी लाभदायक असल्याचे सांगितले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने जीवनात समृद्धी येते. तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होतात, घरामध्ये धनवृद्धी होते, वैवाहिक जीवन सुखी होते, सर्व कामात यश प्राप्त होते, मुलांची प्रगती सुनिश्चित होते आणि व्यवसाय वाढतो. त्यामुळे आज भगवान विष्णूची पूजा कशी करावी आणि विविध शुभफळ मिळविण्यासाठी कोणते विशेष उपाय करावेत जाणून घेऊया.

पापांकुशा एकादशीच्या दिवशी करा भगवान विष्णूची पूजा

जीवनात असलेली आर्थीक समस्या दूर व्हावी आणि घरात कायम सुख समृद्धी टिकून राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर, आज संध्याकाळी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच देवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर  काही वेळाने ते लाडू सर्वांना प्रसाद म्हणून वाटून घ्या आणि स्वतः सुद्धा खा.

एकादशी व्रताचे नियम

एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आचमन करावे व व्रतताचा संकल्प घ्यावा. व्रताचा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला उपवास सोडावा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करा, असे केल्याने तुम्हाला लवकरच भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल.

हे सुद्धा वाचा

भगवान विष्णूची स्तुती

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥

भगवान विष्णूचे मंत्र

ॐ नमोः नारायणाय नमः। ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॥ ॐ विष्णवे नम:

एकादशी व्रताचे महत्त्व

एकादशी ही भगवान विष्णूची सर्वात आवडती तिथी आहे. कोणत्याही विष्णू भक्ताने एकादशीचे व्रत नियमितपणे करावे असे शास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्व त्रास हळूहळू नाहीसे होतात. जो कोणी पापांकुशा एकादशीच्या दिवशी भक्तीभावाने व्रत पाळतो आणि व्रताचे नियम पाळतो, त्याची अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि शेवटी त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. जे भक्त एकादशीचे व्रत खऱ्या मनाने करतात त्यांच्यावर भगवान विष्णू सहज प्रसन्न होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.