Peepal Tree Upay | संतानप्राप्ती, धन लाभ आणि मंगळ दोष निवारणासाठी पिंपळाच्या झाडाचे ‘हे’ उपाय करा
पिंपळाच्या वृक्षाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. या झाडाला हिंदू धर्मात देव वृक्ष असे म्हणतात. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच, पिंपळाची पाने विशेष विधींमध्ये वापरली जातात. हिंदू मान्यतेनुसार, पिंपळाचे झाड हे देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते.
मुंबई : पिंपळाच्या वृक्षाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. या झाडाला हिंदू धर्मात देव वृक्ष असे म्हणतात. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच, पिंपळाची पाने विशेष विधींमध्ये वापरली जातात. हिंदू मान्यतेनुसार, पिंपळाचे झाड हे देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. म्हणून ते धार्मिक कार्यात वापरले जाते. असे म्हटले जाते की घरात पिंपळाचे झाड लावणे खूप शुभ आहे.
आज आम्ही तुम्हाला पिंपळाच्या पूजेचे काही उपाय सांगणार आहोत. त्यांचा अवलंब केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. या उपायांबद्दल आणि पिंपळाच्या वृक्षाच्या पूजेचे नियम जाणून घेऊया –
संतान प्राप्तीसाठी –
ज्या स्त्रियांना मुलं होण्याची इच्छा असेल त्यांनी पिंपळाच्या झाडावर लाल धागा बांधला पाहिजे. लाल धाग्याव्यतिरिक्त, आपण लाल कपडे देखील बांधू शकता. जर एखाद्या जोडप्याला मूल होण्यात अडचणी येत असतील तर त्यांनी 1 तास पाण्यात पिंपळाची पाने ठेवावी. मग ते पान काढून झाडाखाली ठेवा आणि ते पाणी प्या. मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी द्या. याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल.
धन लाभ होण्यासाठी –
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात. अशी मान्यता आहे की पिंपळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने धन प्राप्ती होते.
जुन्या आजारातून सुटका मिळण्यासाठी –
जर तुमच्या घरातील कुठल्या व्यक्तीला कोणता आजार बऱ्याच काळापासून त्रास देत असेल किंवा घरातील कोणी बराच काळापासून आजारी असेल तर त्या व्यक्तीने डाव्या हाताने पिंपळाच्या मुळाला स्पर्श करावा. यासोबतच झोपताना पिंपळाचे पान आपल्या उशीखाली ठेवा.
मंगळ दोष दूर होण्यासाठी –
जर तुमच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल तर काही पिंपळाची पाने पाण्यात टाकावीत, नंतर पाने काढून या पाण्याने स्नान करावे. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात.
देवी-देवतांच्या उपवासाशी संबंधित नियम तुम्हाला माहित आहेत का? नेहमी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाhttps://t.co/YDwsHq5Wls#Adhyatma |#Fasting |#Upasana |#Vrat |#Rules
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Morning Good Luck Mantra | रोज सकाळी उठल्यावर या मंत्रांचा जप करा, प्रत्येक दिवस होईल शुभ