Pithori Amavasya 2023 : पिठोरी अमावस्येचे महत्व काय, पितरांना नैवेद्य दाखविण्याचा विधी आणि उपाय

हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला खूप महत्व आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर होतात.

Pithori Amavasya 2023 : पिठोरी अमावस्येचे महत्व काय, पितरांना नैवेद्य दाखविण्याचा विधी आणि उपाय
pithori amavasyaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 12:52 PM

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात. आजची श्रावण महिन्यातील 14 सप्टेंबरची अमावस्या महत्वाची आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला असाधारण महत्व आहे. हिंदू परंपरेत पिठोरी अमावस्येचे स्नान, दान, पूजा-पाठ आणि पितरांना नैवेद्य दाखविणे यास विशेष महत्व आहे. पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते. चला पाहूयात पिठोरी अमावस्येचे महत्व आणि काही विशेष उपाय पाहूयात..

पिठोरी अमावस्येचे महत्व 

पिठोरी अमावस्या किंवा भाद्रपत अमावस्येचे विशेष महत्व आहे. असे म्हणतात या दिवशी पितरांना नैवैद्य दाखविल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि पितृदोषाने निर्माण झालेल्या समस्या दूर होतात. याच दिवशी श्री हरि भगवान विष्णूच्या पूजेने मोठ्यात मोठे संकट दूर होते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी – देवतांचे आशीवार्द मिळतात.उत्तर भारतात पिठोरी अमावस्येला गंगास्नाला विशेष महत्व आहे. आस्थेने गंगा स्नान केल्यास पापातून प्रायश्चित घेता येते.

पूजा विधी कसा करतात

पिठोरी अमावस्येत सकाळी पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करावी. पांढरी वस्रे परिधान करावीत. पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. एक तांब्यात दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे. त्यांच्यासमोर राईच्या तेलाचे निरांजन प्रज्वलित करुन शिवमंत्राचा जप करावा. नंतर मंदिरात वस्तूंचे दान करावे. सांयकाळी भगवान शंकराची पूजा करावी. तांब्याच्या भांड्याचं दान अवश्य करावे.

सकाळी आणि सायंकाळचे विधी

पिठोरी अमावस्येला सकाळी पहाटे स्नान करुन पांढरे कपडे घालावे. स्टीलच्या तांब्यात तांदूळ आणि पाणी टाकून सुर्याला अर्ध्य द्यावे. सुर्याला धूप आणि निरांजन दाखवावे. दोन्ही हाथ उंचावून सुर्याकडे सुखी जीवनासाठी आर्शीवाद मागावे. ओम सर्य देवाय नम: मंत्राचा जप करावा. पिठोरी अमावस्येला सायंकाळी सुर्यास्ताआधी पूजेस्थळी आणि मुख्य दारावर एक-एक निरांजन ठेवावे. एका थाळीत मळलेल्या पिठाचे निरांजन तयार करावे. मिठाई, फळ, तांदुळ ठेवावे या थाळीला सर्व घरात फिरवावे. घरातून बाहेर जाऊन पूर्वे दिशेला जाऊव शिव मंदिरात नैवेद्य ठेवावा. तुमच्या जीवनातील सर्व दु:ख संकटे यामुळे नष्ट होतील.

भाद्रपद महिन्याची अमावस्येची प्रारंभ आणि समाप्ती खालील प्रमाणे आहे. 14 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 4.48 वाजता अमावस्या सुरु होऊन 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.09 मिनिटांपर्यंत ती आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.