Pitru Paksha 2021 : स्वप्नात येऊन तुमचे पूर्वज तुम्हाला काय सांगू इच्छितात, या संकेतांवरुन ओळखा…
श्राद्ध पक्ष 20 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे आणि 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष हे पूर्वजांना समर्पित मानले जाते. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात आणि जेवण आणि पाण्याच्या स्वरुपात त्यांनी दिलेलं तर्पण आणि श्राद्ध ग्रहण करतात.
मुंबई : श्राद्ध पक्ष 20 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे आणि 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष हे पूर्वजांना समर्पित मानले जाते. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात आणि जेवण आणि पाण्याच्या स्वरुपात त्यांनी दिलेलं तर्पण आणि श्राद्ध ग्रहण करतात.
आपले पूर्वज भौतिक स्वरुपात येऊन आपल्याला काहीही सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत अनेक वेळा ते स्वप्नात येतात आणि आपल्याला काही संकेत देतात. जर तुम्ही पितृ पक्षाच्या वेळी तुमच्या पूर्वजांना तुमच्या स्वप्नात पाहिले तर समजून घ्या की त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. येथे जाणून घ्या अशी काही चिन्हे जी तुमच्या पूर्वजांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
पूर्वजांना काय सांगायचे आहे ते समजून घ्या –
? जर पूर्वज तुम्हाला स्वप्नात काही मागताना दिसले किंवा त्यांचे कपडे फाटलेले असतील किंवा पायात शूज किंवा चप्पल नसेल, तर पितरांनी मागितलेली गोष्ट दान करावी. याने पूर्वज संतुष्ट होतात.
? जर पूर्वज तुम्हाला श्राद्ध पक्षात झाडावर बसलेले किंवा झाडाजवळ उभे असलेले दिसले किंवा खूप कमकुवत दिसले, तर याचा अर्थ ते कुठल्या संकटात आहेत. अशा परिस्थितीत जप, तपश्चर्या आणि ध्यान त्यांच्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी केले पाहिजे.
? जर तुम्हाला घराच्या आजूबाजूला पूर्वज दिसले, तर याचा अर्थ असा की कुटुंबाशी त्यांचा मोह अजूनही संपलेला नाही. अशा स्थितीत तुम्ही पितृपक्षात रोज गाईला चपाती खायला द्यावी.
? जर स्वप्नात पूर्वज खूप आनंदी दिसले किंवा तुमच्या डोक्यावर हात ठेवताना दिसले तर याचा अर्थ असा की तुमचे श्राद्ध त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे आणि ते तुमच्यावर खूप आनंदी आहेत. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वीवर आले आहेत.
पितरांना संतुष्ट करण्यासाठी काय करावे?
पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृ पक्षात त्यांच्या नावाने दान करावे. याशिवाय गीता आणि रामायण पठण करावे. असे मानले जाते की गीता आणि रामायण पठण केल्याने त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि शांती मिळते.
Pitru Paksha 2021 : पितृ पक्षादरम्यान खरेदी करणे शुभ की अशुभ, जाणून घ्या याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टीhttps://t.co/8wuW0zEtqp#PitruPaksha #ShraddhaPaksha2021 #buyingnewthings
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Pitru Paksha 2021 : कावळ्याला पूर्वजांचे स्वरुप का मानलं जातं, जाणून घ्या