AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2023 : आजपासून पितृपक्षाला सुरूवात, जाणून घ्या श्राद्ध तिथी, पुजा विधी आणि महत्त्व

असे मानले जाते की श्राद्ध पक्षाच्या वेळी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या नावाने केलेला प्रसाद स्वीकारतात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात सुख-शांती राहते. पितृ पक्ष भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो.

Pitru Paksha 2023 : आजपासून पितृपक्षाला सुरूवात, जाणून घ्या श्राद्ध तिथी, पुजा विधी आणि महत्त्व
पितृपक्षImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 10:14 AM

मुंबई : वर्षातील पंधरा दिवसांच्या विशेष कालावधीत श्राद्ध विधी केले जातात आणि आजपासून त्याची सुरुवात झाली आहे. श्राद्ध पक्षाला (Pitru Paksha 2023) पितृपक्ष आणि महालय असेही म्हणतात. श्राद्धाच्या वेळी, कुटुंबातील देवता, पूर्वज आणि पितरांबद्दल आदर व्यक्त केला जातो. असे मानले जाते की श्राद्ध पक्षाच्या वेळी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या नावाने केलेला प्रसाद स्वीकारतात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात सुख-शांती राहते. पितृ पक्ष भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणतात. भाद्रपद पौर्णिमेला, वर्षातील कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध केले जाते. अश्विन अमावस्येला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देह सोडणाऱ्यांचे तर्पण करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे. वर्षाच्या कोणत्याही पक्षात, ज्या तिथीला कुटुंबातील पूर्वजांचा मृत्यू झाला असेल, त्याच तिथीला पितृपक्षात श्राद्ध करावे.

पितृ पक्ष 2023 तिथी

29 सप्टेंबर म्हणजेच आजपासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. तिची प्रतिपदा तिथी आज दुपारी 3:26 ते 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच उद्या दुपारी 12:21 पर्यंत असेल. पितृ पक्षाचा कुतुप मुहूर्त 29 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज रात्री 11:47 ते 12:35 पर्यंत असेल. तसेच रोहीण मुहूर्त आज दुपारी 12:35 ते 1:23 पर्यंत असेल. आज दुपारची वेळ दुपारी 1:23 ते 3:46 पर्यंत असेल.

पितृपक्षात पितरांचे स्मरण कसे करावे?

पितृ पक्षामध्ये आपण आपल्या पितरांना नियमित जल अर्पण केले पाहिजे. हे तर्पण दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते. काळे तीळ पाण्यात मिसळून ते पाणी भाताच्या पिंडावर सोडतात. पूर्वजांच्या मृत्यूच्या दिवशी अन्न आणि वस्त्रांचे दान केले जाते. त्याच दिवशी गरीब व्यक्तीला अन्न धान्य दिले जाते. यानंतर पितृ पक्षाचे कार्य संपते.

हे सुद्धा वाचा

पितृ पक्षात हे उपाय करा

पितृ पक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात. पितृपक्षात ताटात भोजन केले आणि ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केले तर ते फलदायी ठरते.

श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसांत केस व नखे कापू नयेत. त्यांनीही ब्रह्मचर्य पाळावे. श्राद्ध विधी नेहमी दिवसा करा. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते. या दिवसात काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरी या भाज्या खाऊ नयेत. प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.