Pitru Paksha 2023 : असे असतात पितृपक्षाचे नियम, या काळात काय खरेदी करावे आणि काय करू नये?
गरूड पूरणानुसार पितृपक्षाच्या काळात काही वस्तू खरेदी करणे आपल्या हिताचे नाही. तर दुसरीकडे काही वस्तू खरेदी करून घरी आणल्याने तुमच्यासाठी भाग्याचे ठरू शकते.
मुंबई : पितृपक्ष (Pitrupaksha 2023) किंवा श्राद्धात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी गाईला पान, पिंडदान इत्यादी कामे केली जातात. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज आपल्याला मृत्यूभूमीत भेट देतात. गरूड पूरणानुसार पितृपक्षाच्या काळात काही वस्तू खरेदी करणे आपल्या हिताचे नाही. तर दुसरीकडे काही वस्तू खरेदी करून घरी आणल्याने तुमच्यासाठी भाग्याचे ठरू शकते. म्हणजेच काही गोष्टींची खरेदी आपण करू शकतो. हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे आणि 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
पितृ पक्षाचे नियम जाणून घ्या
पितृ पक्ष 2023 पितृ पक्षाचे सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या काळात स्नान, ध्यान, श्राद्ध आदी विधी केल्याने व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वादही प्राप्त होतात. पितृ पक्षादरम्यान शास्त्रांमध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते.
पितृ पक्ष कोणत्या तिथीपासून सुरू होतो?
पितृ पक्ष दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन कृष्ण पक्षातील अमावस्या दिवसापर्यंत असतो. पितृ पक्षाचा कालावधी 15 दिवसांचा असतो. यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत असून तो 14 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
पितृ पक्ष काळात या गोष्टी करू नये
मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक उर्जा असते. पितृ पक्षाच्या काळात लग्न, मंगळ, मुंडन, उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही.
नवीन कपडे खरेदी करावे का?
पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते. कारण पितृ पक्षाच्या काळात पितरांना वस्त्र दान केले जाते. यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात.
तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता
पितृ पक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते, यात कोणतीही मनाई नाही. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)