Ashadha Amavasya 2021 | जर कुंडलीत पितृ दोष असेल तर अमावस्येला ही झाडं लावा…

मान्यता आहे की जर या दिवशी पूर्वजांसाठी काही उपाय केले तर त्यांना शांती मिळते आणि पूर्वज संतुष्ट होतात आणि आपल्या मुलांना आशीर्वाद देतात. म्हणून, अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने दान केले पाहिजे आणि गीता पठण केलं पाहिजे. यामुळे, पूर्वजांना तारण प्राप्त होते. आषाढ महिन्याची अमावस्या तारीख 9 जुलै रोजी येत आहे (Plant These Trees On Ashadha Amavasya For Pitru Dosh).

Ashadha Amavasya 2021 | जर कुंडलीत पितृ दोष असेल तर अमावस्येला ही झाडं लावा...
Ashadha Amavsya
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 12:58 PM

मुंबई : कोणत्याही महिन्याची अमावस्या पूर्वजांना समर्पित मानली जाते. मान्यता आहे की जर या दिवशी पूर्वजांसाठी काही उपाय केले तर त्यांना शांती मिळते आणि पूर्वज संतुष्ट होतात आणि आपल्या मुलांना आशीर्वाद देतात. म्हणून, अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने दान केले पाहिजे आणि गीता पठण केलं पाहिजे. यामुळे, पूर्वजांना तारण प्राप्त होते. आषाढ महिन्याची अमावस्या तारीख 9 जुलै रोजी येत आहे (Plant These Trees On Ashadha Amavasya For Pitru Dosh).

अमावस्या तिथीला एखादे झाड लावले तर ते पुण्यकारक मानले जाते. यामुळे, पूर्वज खूप आनंदित होतात आणि झाड जसजसे वाढते तसतसे जीवनाच्या सर्व समस्या दूर होतात. परंतु ही झाडे लावल्यानंतर त्यांची सेवा देखील करावी. आपल्या कुंडलीत जर पितृ दोष असेल तर आपण त्यांच्यासाठी अमावस्येच्या दिवशी रोपे लावा म्हणजे त्यांचे तारण होईल आणि कुटुंबाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. अमावस्येवर झाडे लावण्यास शुभ मानल्या जाणार्‍या वनस्पतींविषयी जाणून घ्या.

पिंपळाचं झाड

सनातन धर्मात पिंपळाचे झाड पूजनीय मानले जाते. श्रीकृष्णाने कलियुगातील त्याचा साक्षात अवतार म्हणून या झाडाचे वर्णन केले आहे. पूर्वजांना शांती देण्यासाठी अमावस्येच्या दिवशी हे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय, अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ असते. जर कुंडलीत गुरु चंडाल योग असेल तर पिंपळाचं झाड नक्की लावा.

वडाचं झाड

शास्त्रात वटवृक्षाला मोक्षदायी वृक्ष मानले जाते. अमावस्येच्या दिवशी हे झाड लावल्याने पूर्वजांना तारण मिळते आणि कुटुंबात भरभराट होते. कुटुंबातील सदस्यांचे वय वाढते. या दिवशी वडाच्या झाडाखाली बसून महादेवाची उपासना करणे देखील खूप शुभ मानले जाते. झाडाची पूजा केल्यानंतर तीन वेळा प्रदक्षिणा घालावी.

बेलाचं झाड

बेल वृक्ष हे महादेवाचे आवडते झाड मानले जाते. अमावस्येच्या दिवशी हे झाड लावल्याने पूर्वज समाधानी होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. याशिवाय, पूर्वजांच्या नावाने शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा आणि बेलपत्र अर्पण केल्यानेही पूर्वजांना शांती मिळते.

तुळस

तुळशीच्या वनस्पतीला देखील वैकुंठात नेणारी एक वनस्पती मानली जाते. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने ही वनस्पतीची लागवड करणे खूप चांगले मानले जाते. याने पूर्वजांना तारण मिळते. पितृ पक्षात तुळशीची लागवड केल्यास ती अधिक शुभ होते. असे म्हणतात की, ज्या घरात तुळशीची वनस्पती आहे, तेथे वास्तुदोष दूर होतो आणि कुटुंबातील सदस्यांना अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळते.

Plant These Trees On Ashadha Amavasya For Pitru Dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?

Ashad Month 2021 | भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आषाढ महिन्यात ही कामं करा, पूर्ण होईल सर्व मनोकामना

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.