Pradosh Vrat 2021 | चंद्राने क्षय रोगातून मुक्तीसाठी पहिल्यांदा केलं होतं प्रदोष व्रत, जाणून घ्या पौराणिक कथा…
प्रदोष व्रत दर महिन्यात दोनवेळा ठेवला जातो. हे व्रत महादेवाला समर्पित (Pradosh Vrat 2021) असते. एकादशीप्रमाणे या व्रताला अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं.
मुंबई : प्रदोष व्रत दर महिन्यात दोनवेळा ठेवला जातो. हे व्रत महादेवाला समर्पित (Pradosh Vrat 2021) असते. एकादशीप्रमाणे या व्रताला अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. मान्यता आहे की हे व्रत केल्याने आणि विधीवत महादेवाची आराधना केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व समस्या आणि अडचणी संपतात (Pradosh Vrat 2021 First Vrat Kept By Moon Know The Katha).
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या तिथीला ठेवलं जाते. आठवड्यानंतर दिवसाच्या हिशोबाने प्रदोष व्रताचे वेगवेगळे नाव आणि महत्त्व आहे. यावेळी प्रदोष व्रत आज 9 एप्रिल 2021 ला आहे. शुक्रवारच्या दिवशी प्रदोष व्रत असल्याने याला शुक्र प्रदोष म्हटलं जातं. प्रदोष व्रत आणि या पूजेबाबत अनेक गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण, काय तुम्हाला माहिती आहे का की या व्रताची परंपरा कशी सुरु झाली आणि या व्रताला पहिल्यांदा कुणी ठेवलं? चला जाणून घ्या –
पौराणिक कथा –
पौराणिक कथेनुसार प्रदोष व्रत पहिल्यांदा चंद्रदेवाने क्षय रोगातून मुक्तीसाठी ठेवला होता. आख्यायिकेनुसार, चंद्रमा यांचा विवाह दक्ष प्रजापतीच्या 27 नक्षत्र कन्यांसोबत झाला होता. याच 27 नक्षत्रांच्या योगाने एक चंद्रमास पूर्ण होतो. चंद्रमा स्वत: रुपवान होते आणि त्यांच्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी अत्यंत सुंदर होती. त्यामुळे या सर्व पत्नींपैकी रोहिणीवर त्यांचं विशेष प्रेम होते. चंद्रमा रोहिणीशी इतकं प्रेम करायचे की त्यांच्या इतर 26 पत्नी त्यांच्या या वागण्याने दु:खी झाल्या आणि त्यांनी दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली.
मुलींचं दु:ख पाहून दक्षही दु:खी झाले आणि त्यांनी चंद्रमाला श्राप दिला की तू क्षय रोगाने ग्रसीत होशील. त्यामुळे हळूहळू चंद्रमा क्षय रोगाने ग्रसित होऊ लागले आणि त्यांच्या सर्व कला क्षीण व्हायला लागल्या. यामुळे पृथ्वीवर विपरित परिणाम होऊ लागला. जेव्हा चंद्रदेवाचं अंत जवळ आला तेव्हा नारदजींनी त्यांना महादेवांची आराधना करण्यास सांगितलं. त्यानंतर चंद्रदेव यांनी त्रयोदशीच्या दिवशी महादेवाचं व्रत ठेवून प्रदोष काळात त्यांची पूजा केली.
व्रत आणि पूजनाने प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना मृत्यूतुल्य कष्टातून मुक्त करुन पुनर्जीवन प्रदान केलं आणि आपल्या डोक्यावर चंद्रमाला धारण केलं. चंद्रमाला पुनर्जीवन मिळाल्यानंतर लोकही आपल्या कष्टांच्या मुक्तीसाठी दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला महादेवाचं व्रत आणि पूजन करु लागले. या व्रतासह प्रदोष काळात महादेवाचं पूजन केलं जातं, त्यामुळे याला प्रदोष व्रत म्हणतात.
जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?https://t.co/Vc59mzNrAO#Mahabharata #Mahadev #Pandav
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
Pradosh Vrat 2021 First Vrat Kept By Moon Know The Katha
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
सूर्य देवाचा जन्म कसा झाला?, जाणून घ्या पौराणिक कथा
आयुष्यात एकदा महादेवाच्या ‘या’ चार प्राचीन मंदिरांचं दर्शन नक्की घ्या
निस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येतं, वाचा एका खऱ्या भक्ताची अनोखी कहाणी