Pradosh Vrat 2021 | 7 जुलैला आषाढ महिन्यातील बुध प्रदोष व्रत, जाणून घ्या दिवसानुसार व्रताचं महत्त्व

प्रदोष व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असतो (Pradosh vrat 2021). या व्रताचे शास्त्रात एक कल्याणकारी व्रत म्हणून वर्णन केले गेले आहे. एकादशीप्रमाणे हा व्रत महिन्यातून दोनदा देखील साजरा केला जातो. हे व्रत महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीवर ठेवला जातो.

Pradosh Vrat 2021 | 7 जुलैला आषाढ महिन्यातील बुध प्रदोष व्रत, जाणून घ्या दिवसानुसार व्रताचं महत्त्व
Pradosh-Vrat
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 1:16 PM

मुंबई : प्रदोष व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असतो (Pradosh vrat 2021). या व्रताचे शास्त्रात एक कल्याणकारी व्रत म्हणून वर्णन केले गेले आहे. एकादशीप्रमाणे हा व्रत महिन्यातून दोनदा देखील साजरा केला जातो. हे व्रत महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीवर ठेवला जातो. प्रदोष काळात या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते (Pradosh vrat 2021 july month importance of this vrat according to the day).

जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत बुधवार 7 जुलै 2021 रोजी पडत आहे. बुधवारी असल्यामुळे त्याला बुध प्रदोष असे म्हणतात. मान्यता आहे की, भोलेनाथ आपल्या भक्तांची भक्ती पाहून खूप लवकर प्रसन्न होतात. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवसांनुसार प्रदोष व्रताचे महत्त्व देखील बदलते.–

1. सोमवारी व्रत ठेवल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ कार्यांचे अडथळे दूर होतात.

2. मंगळवारी व्रत ठेवल्यास आजारांपासून आराम मिळतो आणि मंगळाचे अशुभ परिणाम दूर होतात.

3. बुधवारी प्रदोष व्रत केल्याने घरातील मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना तीव्र बुद्धी मिळते.

4. गुरुवारी हे व्रत ठेवल्याने शत्रूंचा नाश होतो आणि पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतात.

5. शुक्रवारी हे व्रत ठेवल्यास वैवाहिक जीवन आणि भाग्य चांगले मिळते. गरीबी नष्ट होते.

6. शनिवारी हे व्रत ठेवल्यास संतान प्राप्ती होते, मानसिक त्रासातून मुक्तता मिळतेआणि शनि-संबंधित दोष दूर होतात.

7. रविवारी उपवास ठेवल्यास चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. समाजात आदर आणि कीर्ती वाढते.

प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

? प्रदोष व्रत आरंभ – 7 जुलै दुपारी 01:02 वाजता

? प्रदोष व्रत समाप्त – 8 जुलै 2021 रोजी पहाटे 3.20 वाजता

? भगवान शिवच्या पूजेचा शुभ मुहूर्त – संध्याकाळी 07:12 ते 09:20

प्रदोष व्रत पूजा पद्धत

शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा.

या दिवशी भाविक निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवतात.

भांग, धतुरा, बेलपात्र, फुले आणि जलने भगवान शंकरांचा अभिषेक करावा.

पूजेवेळी देवी पार्वतीला लाल ओढणी आणि श्रृगांराच्या वस्तू अर्पण कराव्यात.

विधीवत शिव पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात.

Pradosh vrat 2021 july month importance of this vrat according to the day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?

Ashad Month 2021 | भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आषाढ महिन्यात ही कामं करा, पूर्ण होईल सर्व मनोकामना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.