pradosh vrat 2025 : रुद्राक्षाची उत्पत्ती नेमकं कशी झाली चला जाणून घ्या
Rudraksh Origin : हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ मानले जाते. रुद्राक्ष भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. लोक भगवान शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रुद्राक्ष घालतात, पण तुम्हाला माहिती आहे का रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली?

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केले जाताता. प्रत्येक सणाला त्याचे विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्म ग्रंथानुसार, मदादेवाला देवांचे देव म्हटले जाते. हिंदू धर्मात दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाते. प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास केला जातो आणि भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाचे उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. त्रयोदशीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राक्ष धारण करणे देखील खूप विशेष मानले जाते.
रुद्राक्षाचा भगवान शिवाशी खूप खोल संबंध आहे. शिवपुराण आणि स्कंदपुराणात रुद्राक्षाचे तपशीलवार वर्णन केले आहे. रुद्राक्ष धारण करणाऱ्या लोकांना नियमांचे पालन करावे लागते. ते घालणे खूप फायदेशीर आहे, परंतु अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, भगवान शिव यांना प्रिय असलेल्या या रुद्राक्षाची उत्पत्ती कधी आणि कशी झाली. रुद्राक्षाची उत्पत्ती आणि ते धारण करण्याचे फायदे जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने पृथ्वीवर दहशत निर्माण केली होती. एवढेच नाही तर देवांनाही त्रिपुरासुराने त्रास दिला. त्रिपुरासुराचा पराभव करण्यात कोणताही देव यशस्वी झाला नाही. शेवटी सर्व देव धावत भगवान शिवाकडे पोहोचले. जेव्हा देव भगवान शिवाजवळ पोहोचले, तेव्हा महादेव योगासनात ध्यानात मग्न होते. जेव्हा महादेवाची तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू पृथ्वीवर पडले. हिंदू मान्यतेनुसार, जिथे जिथे भगवान शिवाचे अश्रू पडले, तिथे तिथे रुद्राक्षाची झाडे वाढली. म्हणजेच रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली. महादेवाने त्रिपुरासुराचाही वध केला. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की रुद्राक्षाचे १४ प्रकार आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व असते. अमावस्या, पौर्णिमा, श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राक्ष धारण करावे असे मानले जाते. रुद्राक्ष धारण करणाऱ्या लोकांना मानसिक शांती मिळते. ते आध्यात्मिक प्रगती करतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांवर महादेवाचा आशीर्वाद राहतो. पापे नष्ट होतात. शारीरिक आजार दूर होतात. रूद्राक्ष धारण केल्यामुळे भीती संपते. रुद्राक्ष धारण केल्याने हृदयाचे आजार बरे होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. रुद्राक्ष डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्यांवर आराम देतो. रुद्राक्षाच्या पाण्याचा उपयोग जखमांवर केल्यास त्या लवकर बऱ्या होतात. रुद्राक्ष धारण केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.




रुद्राक्ष धारण करण्याचे मानसिक फायदे
रुद्राक्ष धारण केल्याने तणाव आणि चिंता कमी होऊन मन शांत राहते.
रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सौभाग्य आणि यशाची प्राप्ती होते.
रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, ज्यामुळे जीवनात स्थिरता आणि आनंद मिळतो.
रुद्राक्ष धारण केल्याने कुंडलीतील चंद्राचे अशुभ प्रभाव कमी होतात.
रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सर्व कामात यश मिळवण्यास मदत होते.