Mahakumbha 2025 : हा तर ‘सरकारी कुंभ’; शंकराचार्यांच्या दाव्याने भाविकांमध्ये खळबळ, काय आहे सत्य, तुम्ही सुद्धा जाणून घ्या
Prayagraj Mahakumbha 2025 : महाकुंभात डुबकी मारण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी देशातील कोट्यवधी नागरिकांनी प्रयागराज गाठले. महाशिवरात्रीला सुद्धा मोठी गर्दी उसळली होती. पण जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी मोठी टीका केली.

महाकुंभाच्या आयोजनाने योगी सरकारने कोट्यवधींची माया जमवली. तर दुसरीकडे कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केले.महाशिवरात्रीपर्यंत भाविकांचा उत्साह काही कमी झालेला नव्हता. महाकुंभात डुबकी मारण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी देशातील कोट्यवधी नागरिकांनी प्रयागराज गाठले. महाशिवरात्रीला सुद्धा मोठी गर्दी उसळली होती. तर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी बुधवारी सुरु असलेल्या महाकुंभावर तोंडसुख घेतले. त्यांनी भाविकांचे डोळे उघडले. त्यांच्या जहाल शब्द अनेकांना झोंबले.
हा तर सरकारी कुंभ
बुधवारी सुरू असलेल्या महाकुंभावर शंकराचार्यांनी कडक टीका केली. कुंभ महिन्यातील पौर्णिमेसोबतच महाकुंभ संपल्याचे शंकराचार्य म्हणाले. आता सुरू आहे तो सरकारी कुंभ असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी शास्त्राचा आधार सुद्धा दिला.




शंकराचार्य म्हणाले , “महाकुंभ तर पौर्णिमेलाच संपला. आता जे काही सुरू आहे, तो सरकारी कुंभ आहे. खरा कुंभ, माघ महिन्यातच असतो. माघ महिन्याची पौर्णिमा तर संपली आहे. तर या कुंभात येणारे सर्व ‘कालपवासी’ माघ पौर्णिमेनंतर चालल्या गेले.”
आध्यात्मिक कुंभावर जोर
सरकारकडून आयोजित कुंभमेळ्यावर त्यांनी टीका केली. पारंपारिक कुंभ मेळ्यासारखे त्याचे आध्यात्मिक महत्त्व नाही, सरकार दाव करत असले तरी त्यात भाविकांचा गर्दी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कुंभ मेळ्यावर टिप्पणी करतानाच शंकराचार्य यांनी येत्या 17 मार्च रोजीच्या आंदोलनाविषयी माहिती दिली. गौहत्या सारख्या गंभीर विषयात सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी, सर्व राज्य सरकारांनी एकत्र यावे असे ते म्हणाले. गौहत्या बंदीसाठी शंकराचार्य हे दिल्लीत असतील. ते विविध पक्षांचे नेते, संघटना यांची भेट घेणार आहेत. ते विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहेत. त्यानंतर पुढील धोरण स्पष्ट करणार आहेत.
66 कोटी 21 लाख भाविकांचे पुण्यस्नान
बुधवारी प्रयागराज येथे महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी महाकुंभ संपला. अखेरच्या दिवशी सुद्धा लाखो भाविकांनी पवित्र स्नान केले. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी या महाकुंभात सहभागी भाविकांची आकडेवारी दिली. त्यानुसार, महाकुंभ-2025 मध्ये 66 कोटी 21 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. हा एक रेकॉर्ड आहे. जगभरातील बड्या संस्थांनी या व्यवस्थापनाचे आणि आयोजनाविषयी कुतुहल व्यक्त केले आहे.