Price Hike: धूपबत्ती, उदबत्तीला महागाईचा धूर; कच्या मालाच्या भाववाढीने पूजा साहित्य महाग

गेल्या वर्षभरात सातत्याने इंधन दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी कधीच ओलांडली आहे.  याचा परिणाम थेट महागाईवर (inflation) होताना दिसत आहे. किरणा माल आणि भाजीपाल्यासोबतच पूजेचे साहित्यसुद्धा महाग  झाले आहे. येणारे दिवस हे सणावारांचे आणि व्रत वैकल्यांचे आहे. या दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणात पूजेच्या साहित्यांची खरेदी होते. अशातच पूजेचे साहित्य महाग झाल्याने आता […]

Price Hike: धूपबत्ती, उदबत्तीला महागाईचा धूर; कच्या मालाच्या भाववाढीने पूजा साहित्य महाग
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 4:50 PM

गेल्या वर्षभरात सातत्याने इंधन दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी कधीच ओलांडली आहे.  याचा परिणाम थेट महागाईवर (inflation) होताना दिसत आहे. किरणा माल आणि भाजीपाल्यासोबतच पूजेचे साहित्यसुद्धा महाग  झाले आहे. येणारे दिवस हे सणावारांचे आणि व्रत वैकल्यांचे आहे. या दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणात पूजेच्या साहित्यांची खरेदी होते. अशातच पूजेचे साहित्य महाग झाल्याने आता सणासुदीच्या खर्चातही वाढ होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेच्या साहित्यांमध्ये उदबत्तीही जास्त महाग झाली आहे. स्थानिक ते ब्रँडेड अगरबत्तीच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर धूपबत्तीसुद्धा महाग झाली आहे. 25 रूपये पाव अगरबत्तीची किंमत 30 ते 35 रुपये आहे. आणि 30 रूपयाला मिळणाऱ्या उदबत्तीचे दर थेट 40 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे इतर ब्रँडेड अगरबत्तीच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे, मात्र कोरोनाकाळात ज्या उदबत्तीच्या मागणीत 25 ते 30 टक्के वाढ झाली होती त्यामध्ये आता घट झाली आहे.

केमिकल, डिपिंग तेलाच्या दरात वाढ

उद्बत्तीत वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समध्ये पहिले 5 टक्के जीएसटी लागत होता जो आता वाढून 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचप्रमाणे डिपिंग ऑयलचे दर पूर्वी 140 रूपये प्रती लिटर होते जे आता वाढून 200 रूपये लीटरपर्यंत पोहोचले आहे. याप्रकारे दोन्ही प्रकारच्या उद्बत्तीत वापरल्या जाणाऱ्या कच्चा मालात वाढ झाल्यामुळे उद्बत्तीच्या दरात वाढ झाल्याचे उद्बत्ती व्यापाऱ्यांनी सागितले.

कच्चामालात वाढ, कापूरमध्ये किंचीत घसरण

  1. दुसरीकडे, अगरबत्ती बनवण्यासाठी वापरले जाणारे गोल काड्या बाहेरून मोठ्या प्रमाणात मागवल्या जातात, जे महाग असल्याचे सिद्ध होते.
  2.  या कारणांमुळे आता लोकांना उदबत्ती खरेदी करण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4.  याचप्रकारे धूप उद्बत्तींमध्ये काहींचे दर 30 रूपये पाव, तर काही 35 ते 40 रूपये पाव सांगितल्या जात आहे.
  5.  देवाला लावल्या जाणाऱ्या अष्टगंधाच्या दरातही वाढ झाली आहे. ज्या अष्टगंधाची लहान डबी 30 रुपयात मिळत होती, ती आता 35 रुपयांच्या दरात मिळत आहे.
  6.  दुसरीकडे, जर आपण कापूरबद्दल बोललो तर त्याच्या किमतींमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. कोरोनाच्या काळात 1,200 ते 1,600 रुपये विकल्या जाणाऱ्या कापराची किंमत 950 ते 1000 रुपये किलोपर्यंत सुरू आहे.

याशिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत साबुदाणा, तेल, शेंगदाणे, साखर इत्यादी वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याने उपासाचे पदार्थसुद्धा महाग झाले आहेत . वाढत्या महागाईमुळे उपवास कडक करण्याची वेळ आता लोकांवर आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.