पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराला काय दिली भेट; काय आहे या वस्तूचं धार्मिक महत्त्व?

संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा उत्साह हा बघायला मिळतोय. लोकांमध्ये नक्कीच मोठा उत्साह आहे. सध्या हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळा सुरू आहे. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराला काय दिली भेट; काय आहे या वस्तूचं धार्मिक महत्त्व?
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 2:08 PM

मुंबई : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागल्याचे बघायला मिळतंय. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हातामध्ये चांदीचे ताट घेऊन पोहचल्याचे बघायला मिळाले. तिथेच या ताटामध्ये अजूनही काही साहित्य हे दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराला नेमकी काय भेट दिली याची चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे.

नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात चांदीचे ताट आणि त्यामध्ये इतर काही साहित्य घेऊन पोहचले. याला एक धार्मिक महत्व देखील आहे. मोदी यांनी चांदीचे छत्र राम मंदिराला भेट दिले आहे. याचे नेमके काय महत्व आहे, याबद्दल आपण जाणून घेऊयात. विशेष म्हणजे याला काही धार्मिक महत्व आहेत.

चांदीच्या छत्रचे हे आहेत धार्मिक महत्त्व

-धार्मिक विधींमध्ये अनुष्ठानुसार देवतांना श्रृंगार आणि महिमामंडन करण्यासाठी चांदीचे छत्र भेट दिले जाते. प्राचीन काळात राजे महाराजे यांच्या सिंहासनावर चांदीचे छत्र लावलेले असायचे.

-प्रभु राम हे रघुवंशी आहेत आणि त्यांनी अयोध्याची गादी सांभाळलीये. यामुळे ते राजासारखेच वंदनीय आहेत. यामुळेच त्यांना सन्मान देण्यासाठी त्यांना चांदीचे छत्र हे अर्पित करण्यात आले.

मुळात म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार चांदीचे छत्र हे शक्तीचे सूचक आहे. राजाला क्षत्रपती ही पदवी देण्यासाठी चांदीचे छत्र वापरले जाते आणि देवतांसाठी ही चांदीचे छत्र त्यांच्या आभाळाचे प्रतीक आहे.

हिंदू धर्मात भगवान विष्णूंना क्षीरसागरमध्ये झोपलेले दाखवले आहे. बाकी साप त्याच्या डोक्यावर छत्राच्या स्वरूपात राहतात. हे छत्र हिंदू धर्मातील देवी-देवतांच्या दैवी शक्तीला संबोधित करते.

यामुळेच प्रभू रामाच्या प्रत्येक मंदिरात त्यांच्या मूर्तीवर ठेवलेले छत्र त्यांचा महिमा दर्शवते. यामुळेच नरेंद्र मोदी यांच्याकडून राम मंदिराला हे छत्र भेट दिल्याचे सांगितले जातंय. या छत्राचे खूप मोठे धार्मिक महत्व हे नक्कीच आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.