Pushpak Viman : असे होते रावणाचे पुष्पक विमान, काय होते त्याचे वैशिष्ट्य?

असे म्हणतात की, पुष्पक विमानाप्रमाणे रावणाकडेही अनेक लढाऊ विमाने होती. पौराणिक कथेनुसार, पुष्पक विमान विश्वकर्माने बांधले होते. तथापि, ग्रंथ सांगतात की त्याची रचना आणि तंत्र अंगिरा ऋषींचे होते

Pushpak Viman : असे होते रावणाचे पुष्पक विमान, काय होते त्याचे वैशिष्ट्य?
पुष्पक विमानImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 7:08 PM

मुंबई :  रामायणात पुष्पक विमानाविषयी (Pushpak Viman) विविध ठिकाणी आढळलेल्या वर्णनात असे म्हटले आहे की, या विमानाचा आकार मोरासारखा होता, त्यात अनेक वैशिष्ट्ये होते. पुष्पक विमान पूर्वी रावणाचा सावत्र भाऊ कुबेराकडे होते. मुळात सोन्याची लंका ही कुबेराचीच होती. पुढे रावणाने आपल्या या सावत्र भावाकडून लंका जबरदस्तीने हिसकावून घेतलीच, शिवाय हे पुष्पक विमानही ताब्यात घेतले. यातून रावण कुठेही ये जा करत असे.  यातून रावणाने पंचवटी आश्रमातून सीतेचे अपहरण केले. याच विमानात बसवून रावणाने सीतेला लंकेत नेले होते. जटायूने पुष्पक विमानात स्वार असलेल्या रावणावर (Ravan)  हल्ला केला. रावणाच्या सामर्थ्यासमोर तो माता सीतेला वाचवू शकला नाही.

असे म्हणतात की पुष्पक विमान हे आजच्या विमानासारखे होते. रावण पुष्पक विमानातून प्रवास करायचा. रावणाचा वध करून भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण याच विमानातून लंकेतून अयोध्येला परतले. रामायणात ज्या प्रकारे पुष्पक विमानाचा उल्लेख आहे, त्यावरून असे दिसते की ते आजच्या विमानासारखे होते, परंतु तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते आधुनिक विमानापेक्षा बरेच पुढे होते.

काय आहे पुष्पक विमानाचे रहस्य?

असे म्हणतात की, पुष्पक विमानाप्रमाणे रावणाकडेही अनेक लढाऊ विमाने होती. पौराणिक कथेनुसार, पुष्पक विमान विश्वकर्माने बांधले होते. तथापि, ग्रंथ सांगतात की त्याची रचना आणि तंत्र अंगिरा ऋषींचे होते, ज्यांच्याद्वारे विश्वकर्माने ते बनवले आणि नंतर ते ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. काही कथांनुसार, पुष्पक विमान ब्रह्मदेवानेच बनवले होते. ब्रह्मदेवाने हे विमान कुबेरांना भेट दिले. रावणाने आपल्या ताकदीच्या जोरावर हे विमान कुबेरकडून हिसकावून घेतले असे म्हणतात. त्यानंतर रावणाने आपल्या इच्छेनुसार त्याचा वापर सुरू केला. पुष्पक विमानामुळे रावणाची सैन्य शक्ती वाढली होती.

हे सुद्धा वाचा

पुष्पक विमानाची खासियत काय होती?

पुष्पक विमान हे अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे लढाऊ विमान होते. रामायणातील सुंदरकांडच्या सातव्या अध्यायात पुष्पक विमानाची माहिती मिळते. पुष्पक विमानाचा आकार मोरासारखा होता. ते अग्नी आणि हवेच्या उर्जेने उडत असे. त्याचे तंत्रज्ञान इतके उत्कृष्ट होते की त्याचा आकार कमी आणि मोठा केला जाऊ शकत होता.

या विमानात रावण आपल्या संपूर्ण सैन्यासह उड्डाण करू शकत होता असे सांगितले जाते. पुष्पक विमान पायलटच्या इच्छेनुसार वेग पकडत असे. ते मनाच्या वेगाने उडू शकत होते. म्हणजेच नुसता विचार करून तो इच्छित ठिकाणी पोहोचायचा. ते सर्व दिशांना उडू शकत होते.

या विमानात सोन्याचे खांब असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या पायऱ्यांवर मौल्यवान रत्न जडले होते. विमानात नीलमणीपासून बनवलेले सिंहासन होते. विमानात बसण्यासाठी अनेक जागा बनवण्यात आल्या होत्या. पुष्पक विमान दिवसा तसेच रात्री उड्डाण करू शकत होते.

पुष्पक विमान रिमोटवर चालणाऱ्या विमानासारखे होते

असे म्हणतात की पुष्पक विमान मंत्रांनी सिद्ध झाले होते. जेव्हा विमानाच्या पायलटने त्या मंत्रांचा उच्चार केला, तेव्हाच ते उडायचे. ते रिमोट कंट्रोलच्या विमानासारखे होते. पौराणिक कथेनुसार, पुष्पक विमान केवळ एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीच नाही तर इतर ग्रहांवर देखील प्रवास करू शकत होता. म्हणजेच ते एक प्रकारचे स्पेसशिप होते.

रावणाच्या मृत्यूनंतर पुष्पक विमानाचे काय झाले?

भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून लंका जिंकली होती. पौराणिक कथेनुसार, युद्धानंतर भगवान श्रीरामांनी विमानाची पूजा केली आणि हे दिव्य विमान कुबेरांना परत दिले. कुबेरांनी पुष्पक विमान भगवान श्रीरामांना भेट म्हणून दिले. त्यानंतर भगवान श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण या पुष्पक विमानाने अयोध्येला पोहोचले.

त्याचा कुठेही उल्लेख का नाही?

श्रीलंकेच्या श्री रामायण संशोधन समितीनुसार, रावणाकडे विमाने ठेवण्यासाठी चार विमानतळ होते. या 04 विमानतळांपैकी एकाचे नाव उसंगोडा होते. हे विमानतळ लंका दहनाच्या वेळी हनुमानजींनी जाळून नष्ट केले होते. गुरुलोपोथा, तोतुपोलाकांडा आणि वरियापोला ही इतर तीन विमानतळे वाचवण्यात आली.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.