Raksha Bandhan 2024 Date : यंदाचा रक्षाबंधन कधी? तिथी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय?

भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो. या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं. यंदा कधी आहे रक्षाबंधन? मुहूर्त काय आहे? यावर टाकलेला हा प्रकाश.

Raksha Bandhan 2024 Date : यंदाचा रक्षाबंधन कधी? तिथी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय?
Raksha Bandhan Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 6:56 PM

दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षा बंधन साजरी केली जाते. हा बहीण-भावाचा सण आहे. या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. भावाला ओवाळते. नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते. यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते. राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असते. भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते. पण आता जमाना बदलला आहे. बहीणही भावाचं संरक्षण करताना, त्याचं संगोपन करताना, निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते. बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला गिफ्ट भेट देत असतो. यंदाही रक्षाबंधन कधी आहे? आणि मुहूर्त कधी आहे? याचा घेतलेला हा आढावा.

रक्षाबंधन कधी आहे?

हिंदू पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3 वाजून 4 मिनिटाने मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11 वाजून 55 मिनिटापर्यंत असेल. शास्त्रानुसार, कोणताही उत्सव उदयातिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचं पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे.

रक्षाबंधनाचा मुहूर्त

रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. तो रात्री 9 वाजून 8 मिनिटांनी संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1 वाजून 43 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांपर्यंत आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका आहे. रक्षाबंधनाच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिट ते रात्री 9 वाजून 8 मिनिटापर्यंतचा आहे.

रक्षाबंधनासाठी भद्राकाल

रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ – दुपारी 01:30 वा.

रक्षाबंधन भद्रा पूँछ – सकाळी 09:51 वाजल्यापासून सकाळी 10:53 वाजेपर्यंत

रक्षाबंधन भद्रा मुख – सकाळी 10:53 वाजल्यापासून दुपारी 12:37 वाजेपर्यंत

आरतीची थाळी अशी तयार करा

रक्षाबंधनाच्या दिशी आरतीच्या थाळीत चंदन आवश्यक ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकु, अक्षता, दही सुद्धा ठेवा. कुंकु आणि अक्षतांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावा. त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवा.

रक्षाबंधनाचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते. तर भाऊ सुद्धा या रक्षा सूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.