Rakshabandhan 2023 : रक्षाबंधनला खरेदी करू नका अशा प्रकारची राखी, मिष्ठान्न घेतांनाही लक्षात ठेवा या गोष्टी

राखी घेताना प्रत्येक बहिणीला वाटते की, तिने आपल्या भावासाठी अशी राखी घ्यावी जी खूप सुंदर असेल आणि राखी पाहून भावाला आनंद होईल, पण तुम्हाला माहित आहे का? की, राखीचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.

Rakshabandhan 2023 : रक्षाबंधनला खरेदी करू नका अशा प्रकारची राखी, मिष्ठान्न घेतांनाही लक्षात ठेवा या गोष्टी
रक्षाबंधनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 2:48 PM

मुंबई : रक्षाबंधनाचा (Rakshabandhan 2023) सण श्रावण महिन्याच्या शेवटी म्हणजेच पौर्णिमेला साजरा केला जातो. या वेळी 30 ऑगस्टला हा सण साजरा केला जाणार आहे.  रक्षाबंधनाच्या अनेक दिवस आधीपासून बाजारात राख्यांची विक्री सुरू होते. या वेळी बाजारात विविध प्रकारच्या राख्यांची विक्री होते.  तुम्हीही तुमच्या भावांसाठी राखी खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. तुम्ही तुमच्या भावाला अशा राख्या बांधू नका की त्याच्या दीर्घायुष्याऐवजी त्याच्यावर संकट येईल. राखी घेताना प्रत्येक बहिणीला वाटते की, तिने आपल्या भावासाठी अशी राखी घ्यावी जी खूप सुंदर असेल आणि राखी पाहून भावाला आनंद होईल, पण तुम्हाला माहित आहे का? की, राखीचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.

राखी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • राखी खरेदी करताना लक्षात ठेवा की ती अति मोठ्या आकाराची नसावी. आकाराने मोठी असल्याने ही राखी सहज तुटू शकते ज्यामुळे तुमच्या भावाला आयुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. याचा तुमच्या दोघांच्या नात्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • राखी घेताना राखीमध्ये काळा रंग नसावा हेही लक्षात ठेवा. काळा रंग हा सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्हींचे प्रतीक मानला जातो, परंतु पूजा साहित्यात काळा रंग वापरण्यास मनाई आहे. अशा वेळी ज्या राख्या काळ्या रंगाच्या असतात त्या शुभ मानल्या जात नाहीत. त्यामुळे राखीमध्ये काळा रंग नसावा.
  • तुम्ही तुमच्या भावासाठी लहान आकाराची चांदीची राखी घेऊ शकता. यासोबत तुम्ही अशी राखी देखील घेऊ शकता ज्यामध्ये ओम किंवा स्वस्तिकचे प्रतीक बनलेले असेल.
  • जर तुमच्या घरात जुनी राखी पडली असेल तर ती फेकून देऊ नका, असे करणे राखीचा अपमान मानले जाते. अशा राख्या  वाहत्या नदीत किंवा तलावात विसर्जित कराव्या.
  • बहिनीले राखी बांधल्यावर भावाने तिला भेटवस्तू अवश्य द्यावी. या सणाला कपडे देण्याचे महत्त्व आहे. बहिणीवरचे आपले प्रेम दाखवण्याचा हा सण आहे.

कोणते मिष्ठान्न घ्यावे?

भावासाठी मिठाई निवडताना लक्षात ठेवा की मिठाईमध्ये कडकपणा नसावा. मिठाईमध्ये रस असावा, जेणेकरून भाऊ-बहिणीच्या नात्यात ओलावा टिकून राहिल. रक्षासूत्राप्रमाणेच मिठाईमध्येही काळा आणि तपकिरी रंग टाळावेत. जसे ब्लॅक जॅम आणि चॉकलेट इ. पारंपारिक आणि सांस्कृतिक मिठाई जसे की लाडू, दूध बर्फी, केशर बर्फी, स्पंज, रसमलाई इ.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.